क्रूर आईने सेक्ससाठी विकले ५ वर्षाच्या मुलीला; नंतर चिरमुरडीचा मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:35 PM2022-01-03T18:35:08+5:302022-01-03T18:35:47+5:30

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टी सिपलने तिची मुलगी  कैमेरी हॉलंड हिला काही रुपयांसाठी एका व्यक्तीला विकले.

Cruel mother sells 5-year-old girl for sex; child's body was later found | क्रूर आईने सेक्ससाठी विकले ५ वर्षाच्या मुलीला; नंतर चिरमुरडीचा मिळाला मृतदेह

क्रूर आईने सेक्ससाठी विकले ५ वर्षाच्या मुलीला; नंतर चिरमुरडीचा मिळाला मृतदेह

googlenewsNext

जॉर्जियामध्ये एका आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला सेक्ससाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर महिलेकडून मुलगी विकत घेणाऱ्या व्यक्तीनेच मुलीची हत्या केली. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी मंगळवारी 35 वर्षीय क्रिस्टी सिपलला अटक केली. तिच्याविरोधात मानवी तस्करी आणि खुनाचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टी सिपलने तिची मुलगी  कैमेरी हॉलंड हिला काही रुपयांसाठी एका व्यक्तीला विकले. पोलिसांनी पुढे सांगितले की, त्यांना  कैमेरीचा मृतदेह अलबामाच्या फिनिक्स शहरात असलेल्या एका निर्जन घरात पडलेला आढळला. ती मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार काही काळापूर्वी दाखल झाली होती.

अटक होण्याआधी, क्रिस्टीने WTVM-TV ला सांगितले की, तिच्या मुलीच्या बेपत्ता आणि हत्येत तिचा कोणताही सहभाग नाही. ती म्हणाली, मी आई आहे. मी असे काहीही केलेले नाही. ती माझं आयुष्य होती आणि मी तिच्यासाठी जगत होतो. मलाही तीन मुलगे आहेत. पण माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं.

क्रिस्टीने सांगितले की, तिचे पती कोरी हॉलंड यांच्याकडे कैमेरीचा ताबा होता आणि जेव्हा ती तिच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला तेथून हाकलून दिले. क्रिस्टीने मीडियावर तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोपही केला आहे. क्रिस्टी म्हणाली, मी निर्दोष आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मीडियानेही माझी इतकी बदनामी केली आहे की लोक मला दुष्ट स्त्री समजू लागले आहेत.

तर, पोलिसांचे म्हणणे आहे की, क्रिस्टीने आपली मुलगी जाणूनबुजून एका पुरुषाला विकली. आरोपी क्रिस्टीशिवाय पोलिसांनी 37 वर्षीय जेरेमी ट्रेमेन विल्यम्सलाही अटक केली आहे. त्याने   कैमेरीचा गळा दाबून खून केला होता. शवविच्छेदन अहवालात हेही उघड झाले आहे की, हत्येपूर्वी  कैमेरीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते.



त्याचवेळी  कैमेरीच्या वडिलांनीही या सगळ्यासाठी क्रिस्टीला जबाबदार धरले. ते म्हणाले, "क्रिस्टीने हे करून आपल्याला सर्वात जास्त दुखावले आहे आणि आयुष्यभर वेदना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी तिला अटक केल्याचा मला आनंद आहे. आता आपण न्यायापासून फक्त एक पाऊल दूर आहोत.

Web Title: Cruel mother sells 5-year-old girl for sex; child's body was later found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.