क्रूरता! महिलेवर गँगरेप करून अंगावर बाईक घातली, नंतर रेल्वे रुळावर फेकून आरोपी गेले पळून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:28 PM2022-07-14T13:28:31+5:302022-07-14T13:29:30+5:30
Gangrape Case : महिलेचा डावा पाय कापावा लागला
मथुरेत एका महिलेवर सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी सामूहिक बलात्कार केला आणि नंतर पीडितेच्या अंगावर दुचाकी घातली. यानंतर महिलेला रेल्वे रुळावर फेकून आरोपी पळून गेले. उपचारादरम्यान डॉक्टरांना महिलेचा डावा पाय कापावा लागला. हे प्रकरण कोसीकलां भागातील पोलीस ठाणे आहे.
कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली
ठाणे कोसीकलां भागातील एका गावात एक महिला राहते. पोलिसांना तिने दिलेल्या तक्रारीमध्ये महिलेने म्हटले आहे की, "24 मे 2022 रोजी ती बँकेतून पैसे काढण्यासाठी जात होती. वाटेत तिची गावातील रहिवासी महेशशी भेट झाली. महेश बाईकने कोसीकलांला जात होता. तिला एकटं पाहून महेशने कोसीला सोडण्याबाबत सांगितल्यानंतर ती बाईकवर बसली.
गावापासून काही अंतरावर गेल्यावर महेशला वाटेत त्याचा मित्र महेंद्र भेटला. तोही त्या दोघांसोबत गेला. त्यानंतर कोसीजवळ पोहोचल्यानंतर महेंद्र आणि महेशने तिला पिण्यासाठी थंड पेय दिले. ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर महेश आणि महेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महेश आणि महेंद्र यांनी महिलेच्या अंगावर बाईक घातली . त्यानंतर कोसीकलां येथील महावीर गार्डनजवळून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर महिलेला फेकून दोघांनी पळ काढला, असे पीडितेने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "तेथून जाणाऱ्या काही अनोळखी व्यक्तीने डीआरपीला रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या जीआरपीने महिलेला कोसी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि तिच्या कुटुंबीयांना तेथे माहिती दिली. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने मथुरा येथे रेफर करण्यात आले, परंतु काही दिवस तेथे राहिल्यानंतरही काही फायदा न झाल्याने कुटुंबीय त्यांना आग्रा येथे घेऊन गेले.
पलवलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा पाय कापावा लागला होता, आग्रा येथे उपचार सुरू होते. परंतु, तिच्या पायात जंतूसंसर्ग वाढत होता. उपचाराचा खर्च जास्त असल्याने कुटुंबीयांनी त्याला पलवल येथील सरकारी रुग्णालयात नेले. तिथे पायात जास्त संसर्ग झाल्याने डॉक्टरांना त्याचा डावा पाय कापावा लागला.
महिलेने सांगितले की, उपचारांमुळे एफआयआर लिहिण्यास उशीर झाला असून पीडितेने मंगळवारी कोसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पीडितेने तक्रारीमध्ये लिहिले की, कुटुंबीय तिच्या उपचारात व्यस्त होते, त्यामुळे ते पोलिसांना माहिती देऊ शकले नाहीत. एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुज कुमार म्हणाले, "महिलेच्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे."