विकृतीचा कळस! ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बापाने केला बलात्कार, अटकेनंतर गुन्ह्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 05:35 PM2020-05-29T17:35:26+5:302020-05-29T17:39:11+5:30
आरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले.
ईरोड - बलात्कारप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक करण्यात आली. सोमवारी येथे अंधियूरजवळ ७५ दिवसांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही धक्कादायक आणि बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना तामिळनाडूतील ईरोड येथे घडली. आरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले.
पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती. सोमवारी तिच्या नवऱ्याने या बालिकेवर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत सांगितले. पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्याने दोन आठवड्यांपूर्वीच मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. पोलिस उपनिरीक्षक एस गजलक्ष्मी म्हणाले की, “जेव्हा पत्नी घराबाहेर पडली तेव्हा त्याने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. हा गुन्हा करण्याआधीच ती घरात आली आणि माझ्या मुलीजवळ जाऊ नये असा इशारा दिला. ”
सोमवारी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ती महिला काही कामानिमित्त घराबाहेर गेली आणि बाळाला घरात ठेवून गेली. “तिने आपल्या पतीला बाळाला स्पर्श करु नको असा इशारा दिला होता. मात्र, तरीदेखील त्याने मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या खाजगी भागांना जखमा केल्या.” महिलेने आपल्या जखमी मुलीला आलंपलियम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला सालेम शासकीय मोहन कुमारमंगलम मेडिकल कॉलेज व रुग्णालयात जाण्यास सांगितले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
अधिकाऱ्याने सांगितले की, त्या व्यक्तीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात पॉक्सोच्या विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोबिचेट्टीपालम येथे तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
अघोरी प्रकार... कोरोनामुक्तीसाठी दिला नरबळी ; शिर कापून देवाला केलं अर्पण
बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात