Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:20 PM2021-03-17T19:20:03+5:302021-03-17T19:21:12+5:30

Mumbai police commissione first Reaction : सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितीतून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली आहे.

Currently, the Mumbai Police Force is going through a difficult problem, but ....; Hemant Nagarale's first reaction as Mumbai Police Commissioner | Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

Next
ठळक मुद्देमुंबई पोलीस दलाचं नाव चांगलं होईल, पोलीस दलावर कोणतीही टीका होणार नाही अशी परिस्थिती माध्यमं, लोकांच्या सहकार्याने निर्माण करू, एक सक्षम पोलीस दल म्हणून आम्ही कार्यरत आहोत

सचिन वाझे प्रकरणावरून (Sachin Vaze Case) राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले असून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची विकेट गेली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. अखेर आज महाराष्ट्र सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली. त्यानंतर हेमंत नगराळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन मुंबई पोलीस आयुक्तालयात पदभार स्वीकारण्यासाठी दाखल झाले. ७ वाजताच्या सुमारास नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. 

हेमंत नगराळे म्हणाले की, १९८७ बॅचचे आयपीएस असलेला मी हेमंत नगराळे मी मुंबई पोलीस आयुक्त पदभर स्वीकारत आहे. सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितीतून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य करावं. कोणत्याही प्रकारची टीका मुंबई पोलीस दलावर होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू. मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मालिन झाली आहे, ती सुधारण्याची देखील प्रयत्न करू. असं झालं तर कसं होईल असे प्रश्न न विचारता आणि सुरु असलेल्या तपासाबाबत न विचारता फॅक्ट बेस प्रश्न पत्रकारांनी विचारावे. 

सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थिती जात आहे, ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलीस आयुक्तपदी माझी नेमणूक केली आहे, मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे,  येणाऱ्या दिवसात ती चांगली करण्याचं आणि मुंबई शहरातील अधिकारी आणि कर्मचारी, मग ते खालच्या दर्जापासून वरिष्ठ पातळीपर्यंत सगळ्यांचे सहकार्य मला लाभणार आहे, आणि तो निश्चितपणे मिळेल असा विश्वास नवे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वर्तवला आहे.

Sachin Vaze Case: अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई पोलीस दलाचं नाव चांगलं होईल, पोलीस दलावर कोणतीही टीका होणार नाही अशी परिस्थिती माध्यमं, लोकांच्या सहकार्याने निर्माण करू, एक सक्षम पोलीस दल म्हणून आम्ही कार्यरत आहोत, मागील काही दिवसांपासून हे काही सुरु आहे, सचिन वाझे प्रकरणात रितसर तपास NIA आणि एटीएसकडून सुरु आहे. योग्यरितीने हा तपास होईल याची खात्री आहे, जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे देखील हेमंत नगराळे म्हणाले आहेत. 

Web Title: Currently, the Mumbai Police Force is going through a difficult problem, but ....; Hemant Nagarale's first reaction as Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.