धक्कादायक! ज्या मुलाची करायची होती देखरेख, महिला ऑफिसरने ठेवले त्याच्यासोबतच शारीरिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:26 AM2021-06-23T10:26:31+5:302021-06-23T10:37:14+5:30

एका दुसऱ्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते की, 'बेब तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहे'. त्यासोबतच एशले राइटने पीडित मुलाला काही अश्लील फोटोही पाठवले होते.

Custody officer jailed for sexual relationship with boy, 15, at secure training centre | धक्कादायक! ज्या मुलाची करायची होती देखरेख, महिला ऑफिसरने ठेवले त्याच्यासोबतच शारीरिक संबंध

धक्कादायक! ज्या मुलाची करायची होती देखरेख, महिला ऑफिसरने ठेवले त्याच्यासोबतच शारीरिक संबंध

Next

ब्रिटनमध्ये एका महिला कस्टडी ऑफिसरला १५ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणात दोषी ठरवण्यात आलं आहे. महिलेवर आरोप होता की, तिने तिच्या कस्टडीमध्ये पाठवण्यात आलेल्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याला आक्षेपार्ह मेसेजही पाठवले. 

पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर कोर्टाने महिलेला दोषी ठरवत तुरूंगात पाठवलं आहे. Leicestershire येथे राहणारी २६ वर्षीय कस्टडी ऑफिसर एशले राइटने डिसेंबर २०१८ ते जून २०१९ दरम्यान मुलाचं लैंगिक शोषण केलं होतं.

‘द सन’ मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित मुलाला मिल्टन कीन्स सिक्योर ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये पाठवण्यात आलं होतं. कस्टडी ऑफिसर एशले राइट हेच काम करत होती आणि यादम्यान ती मुलाच्या संपर्कात आली होती. चौकशी दरम्यान पोलिसांनी असे मेसेज मिळाले ज्यात एशले राइटने आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. पीडित मुलाला पाठवलेल्या एका मेसेजमध्ये एशलेने लिहिले होते की, 'मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणखी जास्त वाट बघू शकत नाही'. (हे पण वाचा : Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ)

एका दुसऱ्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते की, 'बेब तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहे'. त्यासोबतच एशले राइटने पीडित मुलाला काही अश्लील फोटोही पाठवले होते. क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, फोटो एशलेच्या घराची झडती घेत असताना तिच्या बेडरूममध्ये सापडले होते. काही फोटो आरोपीच्या आयपॅड आणि मोबाइल फोनमध्ये सापडले. ज्यात ती मुलासोबत दिसत आहे. 

या केसच्या सुनावणीदरम्यान किंग्स्टन क्राउन कोर्टाने सांगितलं की, एशले राइटवर लावण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे तिला शिक्षा मिळायला हवी. या गुन्ह्यासाठी कोर्टाने एशलेला दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि असाही आदेश दिला की, तिचं नाव १० वर्षांसाठी लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांच्या रजिस्टरमध्ये लिहावं. 

याआधीही एशलेला १३ ते १५ वर्षाच्या मुलांचं लैंगिक शोषण करण्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. एशले राइटच्या या गुन्ह्याचा खुलासा तेव्हा झाला झाला, जेव्हा एका इतर कर्मचाऱ्याने तिला एका मुलासोबत अश्लील चाळे करताना पाहिलं होतं.
 

Web Title: Custody officer jailed for sexual relationship with boy, 15, at secure training centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.