बापरे! बर्गर तोंडात घेताच युवकानं जे पाहिलं त्यानंतर त्याला थेट हॉस्पिटल गाठावं लागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:14 PM2021-09-21T16:14:53+5:302021-09-21T16:16:08+5:30
सध्या या ग्राहकावर उपचार सुरु असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे.
राजस्थानच्या राजधानी जयपूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये रात्री उशीरा एका ग्राहकाने हॉटेलवर हलगर्जीपणाचा आरोप लावल्याने गोंधळ झाला. एका ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यासाठी बर्गर ऑर्डर केला होता. त्यानंतर काही वेळाने वेटर बर्गर घेऊन त्याच्या टेबलावर पोहचला. त्यानंतर ग्राहकाने बर्गर खाण्यास सुरुवात केली तेव्हा विचित्र प्रकार त्याच्या निदर्शनास आला त्यानंतर ग्राहकाने हॉटेलमध्ये गोंधळ घातला.
त्या ग्राहकाच्या बर्गरमध्ये जे आढळलं ते पाहून ग्राहकाची तळपायाची आग मस्तकात गेली. या ग्राहकाच्या बर्गरमध्ये छोटा विंचू आढळला. त्यानंतर रेस्टॉरंट मालकाकडे याची तक्रार केली. तेव्हा वाद वाढला. अचानक रेस्टॉरंटच्या स्टाफने ग्राहक आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रेस्टॉरंट संचालक आणि स्टाफ यांच्यासोबत झालेल्या भांडणातून काही वेळानंतर त्या ग्राहकाची तब्येत बिघडली तेव्हा त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आलं. सध्या या ग्राहकावर उपचार सुरु असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे. या ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाविरोधात जवाहर सर्कल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
गर्लफ्रेंडनं सोबत राहण्याचा हट्ट केला, बॉयफ्रेंडला सहन झालं नाही म्हणून त्याने तिचा काटा काढला. हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसही थक्क झाले #Policehttps://t.co/YvlVc72UL5
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2021
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, शांती कॉलनी एअरपोर्ट येथे राहणारा २२ वर्षीय तरुण त्याच्या मित्रांसोबत १७ सप्टेंबरला एका रेस्टॉरंटमध्ये बर्गर खाण्यासाठी गेला होता. त्याने २ बर्गरची ऑर्डर दिली. एक बर्गर मित्रासाठी आणि दुसरा स्वत:ला खाण्यासाठी घेतला. कागदात पॅक असलेला बर्गर खोलून जसं त्याने अर्धा भाग तोंडात चावला तेव्हा त्याच्यात काहीतरी वेगळीच वस्तू असल्याचा संशय आला. बर्गरचा दुसरा हिस्सा जेव्हा त्याने पाहिला तेव्हा त्यात काळ्या रंगाचा किडा असल्याचं दिसून आलं. त्याने तोंडात चावलेला काळा हिस्साही बाहेर काढला. तेव्हा बर्गरच्या आतमध्ये काळ्या रंगाचा मेलेले विंचू असल्याचं उघड झालं. त्यानंतर पुढील प्रकार घडला.