ऐन दिवाळीत ग्राहकांची फसवणूक; पोलिसात ५० तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 08:07 PM2019-10-27T20:07:45+5:302019-10-27T20:09:48+5:30

३ कोटींची फसवणूक; तपासकामी पोलीस पथक गठित

Customer fraud in bankruptcy; In Police lodged 30 complaints | ऐन दिवाळीत ग्राहकांची फसवणूक; पोलिसात ५० तक्रारी दाखल

ऐन दिवाळीत ग्राहकांची फसवणूक; पोलिसात ५० तक्रारी दाखल

Next
ठळक मुद्देतापर्यंत ५४ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुमारे २ कोटी ९३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली आहे.सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोघा दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली - जादा व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत ५४ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुमारे २ कोटी ९३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली आहे. तपासकामी एक पोलीस पथकही गठित करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात गुडविन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गुंतवणूक केल्यास १६ टक्के व्याजदर मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक केली होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावर ज्वेलर्सचे दुकान बंद राहील्याने चर्चेला तोंड फुटले. आणि, समाज माध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक आपले सामान घेऊन पसार झाल्याचा संदेश फिरण्यास सुरुवात झाली. दोन दिवस वाट पाहूनही दुकान उघडण्यात आले नसल्याने अखेर गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सदरचा तक्रार अर्ज दाखल होताच पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे दुकान सील करीत सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोघा दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

या तिघांच्या शोधासाठी एक पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये ५४ गुंतवणूकदारांनी तक्रार दिली असून आतापर्यंत २ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. - सुरेश आहेर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे)

Web Title: Customer fraud in bankruptcy; In Police lodged 30 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.