विमानातील शौचालयातून २६ लाख ५० हजार रुपयांचे सोने कस्टम विभागाने केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:31 PM2018-09-25T20:31:27+5:302018-09-25T20:31:52+5:30
गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्यामाहितीनुसार काल पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडिया (एआय ९९४) चे विमान उतरल्यानंतर काही वेळाने ते येथून बंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार होते.
वास्को - काल पहाटे दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया विमानाची कस्टम विभागाने संशयावरून अचानक तपासणी केली असता आतमध्ये असलेल्या शौचालयात अज्ञाताने लपवून ठेवलेले २६ लाख ६० हजार रुपयांचे सोनं त्यांना सापडल्यानंतर त्वरित कारवाई करून ते सोनं जप्त करण्यात आले. कस्टम विभागाचे अधिकारी त्या विमानातील शौचालयात तपासणी करत असताना त्यांना येथे अज्ञाताने लपवून ठेवलेला कमरेचा बेल्ट आढळल्यानंतर तो तपासणीसाठी चिरण्यात आला असता याच्यामध्ये सदर सोने वितळविल्यानंतर चिकटवून आणल्याचे उघड झाले.
गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्यामाहितीनुसार काल पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडिया (एआय ९९४) चे विमान उतरल्यानंतर काही वेळाने ते येथून बंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार होते. त्या विमानात तस्करीचे सोने असल्याची खात्रीलायक माहिती येथील अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी त्वरित त्या विमानात जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली. तपासणी करण्यात येत असताना त्यांना विमानात असलेल्या शौचालयात एक लपवून ठेवलेला कमरेला घालणारा बेल्ट आढळून आला. या बेल्ट तपासणीसाठी घेतला असता त्याचे वजन दिड किलो ऐवढे असल्याचे कस्टम विभागाच्या समजताच यात काहीतरी संशयास्पद गोष्टीचा सुगावा लागला. नंतर कारवाई करून हा बेल्ट कापण्यात आला असता याच्या मधोमध सोने वितळून चिकटवून नेण्यात येत असल्याचे उघड झाले. कस्टम विभागाने तपासणीकरीत त्या विमानात असलेल्या प्रवाशांना बेल्ट कोणाचा आहे काय याबाबत विचारले असता याच्यावर कोणीही दावा केला नसल्याची माहिती कस्टम विभागाने दिली.
कस्टम विभागाने नंतर पुढची कारवाई करून शौचालयातून लपवून नेण्यात येत असलेले २६ लाख ५० हजार रुपयांचे हे तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेलं सोने कोण व कुठे नेत होता याबाबत सध्या चौकशी चालू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.