शारजाहून आलेल्या प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी जप्त केले १० लाखांचे तस्करीचे सोने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 10:22 PM2021-05-04T22:22:06+5:302021-05-04T22:26:49+5:30
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली.
वास्को - मंगळवारी (दि.४) शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘एअर अरेबीया’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी कारवाई करित १० लाख ३ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. कस्टम अधिकारी विदेशातून आलेल्या त्या विमानातील प्रवाशांची तपासणी करताना त्यांना केरळ येथील मूळ त्या प्रवाशाच्या हालचालीवरून संशय आल्याने त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याने ‘चेक इन बॅगेज’ मध्ये लपवून आणलेल्या २३२ ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या बिस्कीट सापडल्या.
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली. यावेळी या विमानातून आलेल्या एका प्रवाशाच्या हालचालीवरून कस्टम अधिकाºयांना त्याच्यावर दाट संशय निर्माण झाला. त्यांनी त्या प्रवाशाची कसून तपासणी करण्यास सुरवात केली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यांने ‘चेक इन बॅगेज’ मध्ये लपवून आणलेल्या दोन तस्करीच्या सोन्याच्या बिस्कीटा यावेळी कस्टम अधिकाºयांना सापडल्या. यानंतर कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय.बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून अधिकाºयांनी ते तस्करीचे सोने कस्टम कायद्याखाली जप्त केले. तस्करीचे सोने घेऊन सारजाहून आलेला तो प्रवाशी मूळ कासरकोड, केरळ येथील असल्याची माहीती प्राप्त झाली. याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.
२०२१ च्या सुरवातीपासून अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावर जप्त केले १ कोटी ८१ लाखांचे तस्करीचे सोने
दाबोळी विमानतळावर २०२१ वर्षाच्या सुरवातीपासून अजूनपर्यंत कस्टम अधिकाºयांनी विविध प्रवाशांवर कारवाई करित १ कोटी ८१ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहीती विभागातील सूत्रांकडून प्राप्त झाली. गेल्या दहा दिवसाच्या काळात कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर कारवाई करून हे दुसरे तस्करीचे प्रकरण पकडले आहे.