प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:11 PM2021-03-22T22:11:26+5:302021-03-22T22:13:16+5:30

Goa Crime News : २४ तासाच्या आत गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाºयांनी दुसरी कारवाई करत दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून रविवारी (दि.२१) ४३२ ग्राम पेस्ट पद्धतीने आणलेले तस्करीचे सोने जप्त केले.

Customs officials seize smuggled gold worth Rs 17 lakh from passengers | प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने

प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने

Next

वास्को - २४ तासाच्या आत गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाºयांनी दुसरी कारवाई करत दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून रविवारी (दि.२१) ४३२ ग्राम पेस्ट पद्धतीने आणलेले तस्करीचे सोने जप्त केले. कस्टम विभागाच्या अधिकाºयांना चकमा देण्यासाठी त्या प्रवाशाने पेस्टपद्धतीने आणलेले हे सोने तीन कॅप्सूलात भरून गुप्तांगात लवपून तो विमानतळावरून निसटण्याच्या प्रयत्नात होता, मात्र कस्टम
अधिका-यांना विमानतळावर एक प्रवासी तस्करीचे सोने आणणार असल्याची माहीती पूर्वीच प्राप्त झाल्याने त्याचा हा बेत फसला. २४ तासाच्या आत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी केलेल्या दोन कारवाईत एकूण १ किलो २५३ ग्राम तस्करीचे सोने जप्त केले असून दोन्ही कारवाईत जप्त केलेल्या सोन्याची एकूण कींमत ५० लाख ५ हजार रुपये असल्याची माहीती प्राप्त झाली. (Customs officials seize smuggled gold worth Rs 17 lakh from passengers)

रविवारी दाबोळी विमानतळावर एक प्रवाशी तस्करीचे सोने घेऊन येणार अशी पूर्व माहीती कस्टम अधिकाºयांना मिळताच त्यांनी येथे कडक रित्या सतर्कता ठेवली. दुबईहून दाबोळीवर आलेल्या एअर इंडीया (एआय ९९४) विमानातील एका प्रवाशावर अधिकाºयांना त्याच्या हालचालीवरून संशय निर्माण होताच त्याला बाजूला घेऊन त्याच्याशी कसून चौकशी केली असता त्यांने तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले. यानंतर त्याची झडती घेतली असता त्यांने पेस्टपद्धतीने कॅप्सूलमध्ये घालून आणलेले ते सोने गुप्तांगात लपविल्याचे उघड झाले. कस्टम अधिकाºयांनी याप्रकरणात कारवाई करून नंतर कस्टम विभागाच्या १९६२ कायद्याखाली तस्करीचे ते सोने जप्त केले. रविवारी कारवाई करून जप्त केलेल्या त्या तस्करीच्या सोन्याची किंमत १७ लाख ३९ हजार रुपये असल्याची माहीती प्राप्त झाली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या सहाय्यक आयुक्त जुलीयेटा फर्नांडीस व संयुक्त आयुक्त एम.एस मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.

२४ तासाच्या आत दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने तस्करीच्या सोन्याबाबत केलेली ही दुसरी कारवाई आहे. शनिवारी (दि.२०) कस्टम अधिकाºयांनी विदेशीतून आलेल्या एका प्रवाशाकडून ३३ लाख ६ हजार रुपयांचे (८२१ ग्राम सोने) तस्करीचे सोने जप्त केले होते. सलग दोन दिवसात केलेल्या दोन वेगवेगळ््या कारवाईत कस्टम अधिकाºयांनी विदेशातून आलेल्या दोन प्रवाशांकडून एकूण ५० लाख ५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने (१ कीलो २५३ ग्राम) जप्त केले आहे.

Web Title: Customs officials seize smuggled gold worth Rs 17 lakh from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.