लॉकडाऊनदरम्यान सायबर सेलची उल्लेखनीय कारवाई सुरूच, २४२ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 07:57 PM2020-04-20T19:57:24+5:302020-04-20T20:00:22+5:30

काल १९/०४/२०२० रोजी महाराष्ट्रात फक्त एकाच नवीन गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. 

Cyber Cell launches significant action during lockdown, 242 cases registered pda | लॉकडाऊनदरम्यान सायबर सेलची उल्लेखनीय कारवाई सुरूच, २४२ गुन्हे दाखल

लॉकडाऊनदरम्यान सायबर सेलची उल्लेखनीय कारवाई सुरूच, २४२ गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देअमरावती शहरांतर्गत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काल एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी  ८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काल १९/०४/२०२० रोजी महाराष्ट्रात फक्त एकाच नवीन गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. 


महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण २४२ गुन्ह्यांची (ज्यापैकी ८ N.C आहेत) नोंद १९ एप्रिल २०२० पर्यंत झाली आहे .त्यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १९, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, अमरावती ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, ठाणे ग्रामीण ४, सोलापूर शहर ३, रायगड २, हिंगोली २, वाशिम १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 


या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्स अ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११० गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी  ८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .
अमरावती शहरांतर्गत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काल एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली ,ज्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन सुरु असताना देखील दोन धर्मात तेढ निर्माण होऊन, परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मजकूर असणाऱ्या पोस्ट्स टाकल्या होत्या. 


महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कोरोना महामारीच्या संबंधित कोणत्याही माहितीची,सरकारी माहितीसोबत सत्यता पडताळून बघितल्या शिवाय कोणाला तोंडी किंवा लिखित स्वरूपात किंवा सोशल मिडियावर (फेसबुक,इंस्टाग्राम ,व्हाट्सअँप इत्यादी) शेअर करू नये. अशा खोट्या व चुकीच्या पोस्ट्स , फॉरवर्ड मेसेजेस , फोटोज किंवा व्हिडिओ पाठविणाऱ्यांवर सरकारी आदेशांचे व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो .जर कोणी या कोरोना महामारीबाबत खोटी किंवा चुकीची माहिती ,मेसेजेस ,फोटोज ,विडिओ तुम्हाला पाठवत असतील तर त्याबाबत तुम्ही तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण द्यावी .


महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की, कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media)पसरवू नयेत,व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये. 
 

 

 

Web Title: Cyber Cell launches significant action during lockdown, 242 cases registered pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.