Cyber crime: नाशिक महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे अकाउंट हॅक; पैशाची मागणी
By संजय पाठक | Published: September 16, 2022 01:46 PM2022-09-16T13:46:12+5:302022-09-16T13:46:59+5:30
Cyber crime: महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून पैसे मागण्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी केली आहे.
- संजय पाठक
नाशिक- महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून पैसे मागण्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी केली आहे.
गेल्या महिन्यामध्ये नाशिक विभाग आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्या नावाने व्हाट्सअपद्वारे पैसे मागण्याचा प्रकार घडला होता त्यानंतर आता महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या बाबतीत प्रकार घडला आहे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून फ्रेंड लिस्ट मधील व्यक्तींकडून पैसे मागण्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हे अकाउंट बंद केले आहे आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये असे आवाहन डॉ नागरगोजे यांनी केले आहे.