गुगलच्या माध्यमातून सायबर क्राइम! लोक स्वत: फोन करून अडकतायेत गुन्हेगारांच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:59 PM2021-11-08T13:59:01+5:302021-11-08T14:00:04+5:30

Cyber Crime : पूर्वी सायबर गुन्हेगार लोकांना फोन करायचे पण आता सायबर गुन्हेगार लोकांना फोन करत नाहीत, लोक स्वतःच सायबर गुन्हेगारांना फोन करून त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.

cyber crime is happening with the help of google people are getting trapped by calling the thugs themselves | गुगलच्या माध्यमातून सायबर क्राइम! लोक स्वत: फोन करून अडकतायेत गुन्हेगारांच्या जाळ्यात 

गुगलच्या माध्यमातून सायबर क्राइम! लोक स्वत: फोन करून अडकतायेत गुन्हेगारांच्या जाळ्यात 

Next

देवघर : झारखंडच्या देवघर पोलिसांनी 11 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी सायबर फसवणुकीचा मार्ग बदलल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्वी सायबर गुन्हेगार लोकांना फोन करायचे पण आता सायबर गुन्हेगार लोकांना फोन करत नाहीत, लोक स्वतःच सायबर गुन्हेगारांना फोन करून त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.

सायबर गुन्हेगार गुगलवर मोठ-मोठ्या शॉपिंग कंपन्याचे, बँकेचे कस्टमर केअर आणि मोबाईल फोनचे कस्टमर केअरचे बनावट नंबर गुगलवर जाहिरातीद्वारे देतात आणि ज्यावेळी कोणीही सामान्य व्यक्ती आपल्या गरजेसाठी गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च केल्यानंतर पहिल्यांदा बनावट नंबर येतात, कारण गुन्हेगार गुगलला पैसे देऊ सर्च विंडोमध्ये बनवट नंबर वरती दाखवण्यास सांगतात.

दरम्यान, सर्च केल्यानंतर त्या वेबसाईटच्या समोर AD लिहिलेले असले तरी काही लोकांना समजत नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगारांची मदत घेतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात. अशा 11 सायबर गुन्हेगारांना झारखंडमधील देवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 मोबाईल, 28 सिम, 16 पासबुक, 1 चेकबुक, 6 एटीएम आणि 48 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 

सायबर डीएसपी सुमित प्रसाद यांनी सांगितले की, पोलिसांनी अशा 11 सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक केली आहे, जे नवीन पद्धतीने सायबर फसवणूक करत होते आणि या कामात ते अनोख्या पद्धतीने गुगलची मदत घेत होते.

Web Title: cyber crime is happening with the help of google people are getting trapped by calling the thugs themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.