सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:46 PM2024-04-02T12:46:22+5:302024-04-02T13:02:27+5:30
पोलिसांनी दोन दिवसांत जवळपास ३८ सायबर गुन्हेगारांसह एकूण ९० जणांना अटक केली आहे.
नुह : झारखंडमधील जामतारा सायबर फसवणुकीसाठी चर्चेत आहे. पण आता हरियाणाचे नूह हे ठिकाण नवीन जमतारा झाले आहे. येथे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा परिसर आता सायबर गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत जवळपास ३८ सायबर गुन्हेगारांसह एकूण ९० जणांना अटक केली आहे.
नूह येथील अतिरिक्त एसपी सोनाक्षी सिंह यांनी सांगितले की, शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्हा नुह पोलिसांनी सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि इतर विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ३९ गुन्हेगारांसह जवळपा ९० आरोपींना अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून ४८ मोबाईल फोन, ८२ बनावट सिमकार्ड, १८१८० रुपये, एक मोटारसायकल व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत, सर्व गुन्हे अन्वेषण शाखा/कर्मचारी, सायबर सेल, पोलीस ठाणे आणि चौकी स्तरावर पथके तयार करण्यात आली. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी छापे टाकले. यावेळी जिल्हा नूह पोलिसांच्या विविध पथकांनी १४ पोओ आणि बेल जम्पर, जुगार खेणाऱ्या ७ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून १८१०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त केली. तसेच, इतर विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या २५ आरोपींना अटक करण्यात आली.
जिल्हा नूह पोलिसांनी प्रखरपण ॲपच्या मदतीने सायबर गुन्हेगारांवर निशाणा साधला. सायबर फसवणुकीत सहभागी असलेल्या ३९ सायबर ठगांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ४८ मोबाईल फोन, ८२ बनावट सिमकार्ड व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करताना चुकीच्या पद्धतीने लेन बदलून वाहन चालविणाऱ्या ४१९ वाहनचालकांसह एकूण ९८२ जणांचे चलन कापले, असे सोनाक्षी सिंह यांनी सांगितले.