डी कंपनीचा दानिश मुंबई पोलिसांच्या जाळ्यात; अमेरितून प्रत्यार्पण करण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:01 PM2019-01-08T13:01:46+5:302019-01-08T13:04:59+5:30
दानिश सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा शस्त्र तस्कर दानिश अलीलीचा ताबा मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. दानिश सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अमेरिकेने नार्को टेररीझमप्रकरणी दाऊदचा पुतण्या सोहेल कासकर, दानिश याच्यासह दोन पाकिस्तानी नागरिकांना 2014 मध्ये अटक केली होती.
अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडे यांना पकडण्यासाठी ठोस पुरावा नसल्यामुळे या दोघांना पकण्यासाठी अमेरिकेने व्यूहरचना आखली. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याचे एक पथक कोलंबिया सरकारच्या विरोधात असल्याचे भासवून या दोघांशी संपर्क साधला. त्यानंतर शस्त्र खरेदी आणि देवाण घेवाणाची बोलणी केली. कुठला साठा हवा आहे. यापासून ते त्यांच्या रक्कमेपर्यंत सर्व गोष्टी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत त्यांच्या व्हिडिओ आणि ओडिओ रेकॉंर्डिंगवर घेत होते. या दोघांकडून पुरेशी माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने सोहेल आणि दानिशसह हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल यांना स्पेनमधून 2014 साली अटक केली. त्यानंतर चौघेही दीड वर्ष तुरुंगामध्ये होते. चौघांनी ही गुन्ह्यांची कबूली दिल्यानंतर त्यांचा ताबा एबीआयला देण्यात आला.12 सप्टेंबर 2015 गुन्ह्यांची कबूली दिल्यामुळे न्यायालयाने दोघांना अडीज वर्षांची जाडा पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणेने देखील प्रयत्न सुरू केल्यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने दानिशचा ताबा भारताला देण्याची परवानगी दिली. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2018 रोजी दानिशचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळाला. सोहेलच्या बाबतीत देखील दोन्ही देशांमध्ये परस्पर सामंज्यस्य करार झालेला आहे. त्यामुळे लवकरच सोहेलचा ताबा भारताला मिळू शकतो. सोहेलविरोधात भारतात एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, त्याच्या मदतीने तपास यंत्रणांना डी कंपनी व त्यांच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळू शकते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.