बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने फिल्मी स्टाइलमध्ये केलं किडनॅपिंग, १ कोटी रूपयांची केली होती मागणी; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 02:01 PM2021-12-25T14:01:43+5:302021-12-25T14:02:32+5:30
Delhi Boyfriend-Girlfriend Kidnapped Banquet Hall Owner: आरोपींनी प्लान करून बॅंकट हॉलच्या मालकाला किडनॅप करत १ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पीडितच्या परिवाराने ५० लाख रूपये दिले होते.
राजधानी दिल्लीमधून (Delhi) किडनॅपिंगची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी किडनॅपिंगची एक केस सॉल्व्ह करत बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्डसहीत (Delhi Boyfriend-Girlfriend Kidnapped Banquet Hall Owner) ४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी प्लान करून बॅंकट हॉलच्या मालकाला किडनॅप करत १ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पीडितच्या परिवाराने ५० लाख रूपये दिले होते. पण जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तर किडनॅपिंग करणारे ओळखीचेच निघालेल. पोलिसांनी त्यांच्याकडून ३५ लाख रूपये ताब्यात घेतले.
बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड किडनॅप
दिल्ली पोलिसांनुसार, १७ डिसेंबरला बॅंकट हॉलचा मालक विकासचा मुलगा तीनसुख आपल्या ड्रायव्हर आणि फ्लॉवर डेकोरेटर रिचासोबत सकाळी फूल मंडीत फूल खरेदी करण्यासाठी गेला होता. परत येत असताना पिस्तुलाचा धाक दाखवत आरोपींनी त्यांना किडनॅप केलं. नंतर तीनसुखच्या वडिलांना फोन करत १ कोटी रूपयांची खंडणी मागितली.
नंतर गाजीपूरजवळ विकास ५० लाख रूपये घेऊन आला. ५० लाख रूपये घेऊन किडनॅपरने तीनसुख, रिचा आणि त्याच्या ड्रायव्हरला सोडलं. पण पैसे घेऊन आलेल्या विकासला कारमध्ये बसवून पिस्तुलाचा धाक दाखवत त्यालाच किडनॅप केलं. त्याला दिल्लीत ३० किलोमीटर फिरवलं त्यानंतर पश्चिम विहार भागात विकासला कारमध्ये सोडून ५० लाख रूपये घेऊन किडनॅपर फरार झाले.
पोलिसांनी सॉल्व केली किडनॅपिंग केस
किडनॅपिंगची सुरूवात गाजीपूरमधून झाली होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली. टेक्निकल सर्व्हिलांस आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केस वर्क आउट केली. पोलिसांना चौकशी दरम्यान ड्रायव्हर आणि फ्लॉवर डेकोरेटर रिचावर संशय आला. पोलिसांना काहीतरी क्लू सापडला आणि त्यांनी गुरमीतला अटक केली. तो ट्रान्सपोर्टचं काम करतो. त्यानंतर रिचा आणि तिच्या आईला अटक केली. नंतर समजलं की, किडनॅपिंगमध्ये चार लोक सहभागी होते.