डब्बा-सट्ट्याचा व्यवहार : इतवारीतील व्यापारी बंधूंनी बुडविले ५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:24 AM2020-01-24T00:24:36+5:302020-01-24T00:28:27+5:30

डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्याशी संबंधित इतवारीतील दोन बंधूंनी सुमारे ५० कोटी रुपये हडपल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Dabba-betting trading: businessmen brothers in Itwari duped 50 crores | डब्बा-सट्ट्याचा व्यवहार : इतवारीतील व्यापारी बंधूंनी बुडविले ५० कोटी

डब्बा-सट्ट्याचा व्यवहार : इतवारीतील व्यापारी बंधूंनी बुडविले ५० कोटी

Next
ठळक मुद्देसंबंधित वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्याशी संबंधित इतवारीतील दोन बंधूंनी सुमारे ५० कोटी रुपये हडपल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी हे दोघे बंधू सराफा बाजारात छोटे दुकानदार म्हणून ओळखले जायचे. ते दागिनेही गहाण ठेवत होते; नंतर मात्र त्यांनी डब्बा आणि सट्ट्याचा गोरखधंदा सुरू केला. त्यात बड्यांची साथ मिळाल्याने ते रोज कोट्यवधींची हार-जित करू लागले. दरम्यान, त्यांनी इतवारीत सहा कोटींची तर अन्य काही ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता घेतली. ते जग्वार, ऑडीसारख्या आलिशान कारचा काफीला घेऊन फिरत होते. ५० लाख ते एक कोटीची बीसी चालवू लागले. फायनान्सच्या नावाखाली मोठी रक्कम उधार घेऊ लागले. ५० लाखांची रक्कम उधारित घेतल्यानंतर ११० दिवसांत ते ५५ लाख रुपये द्यायचे, असा सौदा होता. वेळेवर व्याज आणि मुद्दल परत मिळत असल्याने त्यांना मोठ्यात मोठी रक्कम सहजपणे कर्जाच्या रूपात मिळत होती. कथित आर्थिक प्रगतीमुळे डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्यातील मोठमोठे खेळाडू त्यांच्यासोबतच व्यवहार करू लागले.
दोन ते तीन महिन्यांपूर्वी अचानक या व्यापारी बंधूंनी देणेदारांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी टाळणे सुरू केले. इकडे-तिकडे रक्कम अडकली आहे, असे कारण सांगून ते प्रारंभी देणेदारांना मुदत मागू लागले. अनेकांना एकसारखेच उत्तर मिळत असल्याने आणि या गोरखधंद्यातील मंडळी एकमेकांच्या ओळखीची असल्याने संशय निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यावर घेणेकरांनी दडपण वाढवले. त्यांच्या दुकान आणि घरी चकरा वाढल्या. त्यानंतर संबंधित बंधूंचा बंगला आणि आलिशान वाहनेही बँकेत गहाण असल्याचे माहीत पडले. या पार्श्वभूमीवर व्यापारी बंधूंनी एक आठवड्यापूर्वी देणेदारांना तात्काळ रक्कम परत करण्यास इन्कार केला. त्यामुळे आपली रक्कम बुडल्याचे कर्जदारांना माहिती पडले.
सूत्रानुसार, या व्यापारी बंधूंवर डब्बा, सट्टा, अवैध सावकार आणि बीसीची ५० कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. केवळ पाच वर्षांत त्यांची प्रगती आणि अधोगती झाली आहे. त्यामुळे अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. हत्याकांडात वॉन्टेड असलेल्या एका सटोड्याने पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम गमावली आहे. ५० कोटीतील बहुतांश रक्कम रोखीतील आहे. त्यामुळे तक्रार केल्यास स्वत:लाच तपासाला सामोरे जावे लागणार अशी भीती असल्याने रक्कम देणारे तक्रारही करू शकत नाही. त्याची कल्पना असणारे बिनधास्त आहेत. वाद टाळण्यासाठी ते अनेकांना आपली मालमत्ता विकून रक्कम परत करण्याचे आश्वासन देत आहे.

दररोज दोन लाखांची किस्त
नमूद व्यापारी बंधूंनी सेंट्रल एव्हेन्यूवरील एका सावकाराकडून दोन कोटींचे कर्ज घेतले. सावकाराला रोज दोन लाख रुपयांची किस्त ते देत होते. ११० दिवसांत ही रक्कम परत करायची होती. यासोबतच आणखी काही सावकारांकडून त्यांनी रोज किस्तीने रक्कम परत करण्याच्या अटीवर कर्ज घेतले होते. ते किस्त परत करीत नसल्यामुळे सर्वप्रथम सावकारांनाच या व्यापारी बंधूंनी हात उभे केल्याचे माहीत पडले होते. या प्रकरणाची आर्थिक एजन्सीकडून चौकशी करण्याची मागणी संबंधित वर्तुळातून होत आहे. कसून चौकशी झाल्यास रोखीने व्यवहार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा खुलासा होऊ शकतो.

 

Web Title: Dabba-betting trading: businessmen brothers in Itwari duped 50 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.