दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेचा सनातनने केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 07:58 PM2019-05-25T19:58:31+5:302019-05-25T20:00:42+5:30
केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना अधिवक्ता पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे यामागे षड्यंत्र आहे.
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे असे नमूद करणारे पत्रक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना अधिवक्ता पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे यामागे षड्यंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे अधिवक्ता पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवा, देशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना तसेच अधिवक्ते यांनी पाठिंबा कळवला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक