सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:28 PM2021-04-05T20:28:40+5:302021-04-05T20:31:18+5:30
Gold Smuggling : १७ दिवसात दाबोळीवर तीन कारवाईत ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त
वास्को: सोमवारी (दि.५) दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या इंडीगो (६इ - ८४४५) विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिका ऱ्यां नी ३ लीख ३७ हजार ५९० रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. त्या प्रवाशाने दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांना चकमा देण्यासाठी सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणले होते, मात्र तस्करीचे सोने येणार असल्याची पूर्व माहीती अधिकाऱ्यांना असल्याने त्या प्रवाशाचा बेत फसला. गेल्या १७ दिवसात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करीच्या सोन्याबाबत केलेली ही तिसरी कारवाई असून यातिनही कारवाईत मिळून एकूण ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना सोमवारी एक प्रवाशी विदेशातून तस्करीचे सोने घेऊन येणार असल्याची पूर्व माहीती प्राप्त झाली होती. त्यानुसार कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हाय बी सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवण्यात आली होती. दुबईहून दाबोळीवर उतरलेल्या एका प्रवाशावर त्याच्या हालचालीवरून कस्टम अधिकाऱ्यांना दाट संशय निर्माण झाल्यानंतर त्याला बाजूला करून त्याच्याशी चौकशी करण्यास अधिका ऱ्यां नी सुरवात केली. चौकशीवेळी हा प्रवाशी मूळ कासरकोड, केरळ येथील असल्याचे स्पष्ट होऊन त्यांने तस्करीचे सोने आणल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केली असता त्यांने सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांगात लपवून आणल्याचे उघड झाले. यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी कारवाई करत त्या प्रवाशाने आणलेले तस्करीचे सोने जप्त केले. हा प्रवाशी ते तस्करीचे सोने कुठे नेणार होता, या तस्करीच्या प्रकरणात त्याच्याबरोबर अन्य कोणी शामील आहे का इत्यादीबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
१७ दिवसात दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी कारवाई करून जप्त केले ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने
दाबोळी विमानतळावर विदेशातून येणारे काही प्रवाशी तस्करीचे सोने घेऊन येण्याच्या प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या १७ दिवसात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी केलेल्या तीन कारवाईत ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असून याप्रकरणात अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
२० मार्च रोजी दाबोळी विमानतळावर विदेशातून आलेल्या एका प्रवाशावर कस्टम अधिकाºयांना संशय निर्माण झाल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यांने तस्करीचे सोने आणल्याचे स्पष्ट झाले होते. त्या प्रवाशाने ६१० ग्राम वजनाचे तस्करीचे सोने द्रव्य पद्धतीने थैलीत तर २११ ग्राम तस्करीचे सोने दोन सरपळीच्या रुपाने (एकूण वजन ८२१ ग्राम) लपवून आणले होते. त्या प्रवाशाने एकूण ३३ लाख ६ हजार ९७ रुपयांचे तस्करीचे सोने आणल्याचे चौकशीवेळी उघड झाल्यानंतर कस्टम अधिकाºयांनी उचित कारवाई करून ते सोने जप्त केले. यानंतर २२ मार्च रोजी विदेशातून दाबोळीवर उतरलेल्या विमानातील अन्य एका प्रवाशाने तस्करीचे सोने आणल्याचे चौकशीवेळी कस्टम अधिकाऱ्यांना स्पष्ट झाले. त्या प्रवाशाने ४३२ ग्राम पेस्ट पद्धतीने तस्करीचे सोने काही कॅप्सूलमध्ये भरून गुप्तांगात लपवून आणल्याचे तपासणीवेळी स्पष्ट झाल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करून ते सोने जप्त केले. जप्त केलेल्या त्या सोन्याची कींमत १७ लाख ३९ हजार रुपये असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली होती. यानंतर सोमवारी (५ एप्रिल) कस्टम अधिका ऱ्यां नी पुन्हा कारवाई करून विदेशातून आलेल्या प्रवाशाकडून ३ लाख ३७ हजार ५९० रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असून गेल्या १७ दिवसात एकूण ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.