Video : पनवेलमध्ये दरोडा; व्यापाऱ्यावर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 20:20 IST2021-08-04T19:45:28+5:302021-08-04T20:20:52+5:30
Dacoity Case : या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले.

Video : पनवेलमध्ये दरोडा; व्यापाऱ्यावर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार
पनवेल - पनवेलमधील सराफा बाजारात आज दुपारी पावणेचारच्या सुमारास एका व्यापाऱ्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले.
या पिशवीत साधारण ११०० ग्राम सोने असल्याचे समजते. सराफा बाजारातील सोने पॉलिश करणारे रावसाहेब पांडुरंग कोळेकर यांच्या पेढीवर आलेल्या एका इसमावर हा हल्ला झाला. सदर हल्लेखोर एका दुचाकीवरून पसार झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय.
पनवेलमधील सराफा बाजारात दरोडा; व्यापाऱ्यांवर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार pic.twitter.com/5ttu2naMvQ
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021