खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र टोळीचा दरोडा; चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 06:30 PM2020-05-30T18:30:34+5:302020-05-30T18:32:26+5:30
लॉकडाऊन दरम्यानही गुन्हेगारी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरले आहेत.
कोरोनाच्या संकटात लॉकडाउन देशात लागू आहे. लॉकडाऊन राखण्याबरोबरच गरजूंना आवश्यक ती मदत पुरविणे याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही पोलीस जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, लॉकडाऊन दरम्यानही गुन्हेगारी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिल्लीपोलिस अपयशी ठरले आहेत.
दिल्लीतील गुन्हेगारांनी आता नर्सिंग होमलाही लक्ष्य बनवण्यापासून सोडले नाही आहे. दिल्लीतील महिंद्रा पार्क पोलिस स्टेशन परिसरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी कॅश काऊंटरची लूटमार केली आणि तेथून पळ काढला. ही घटना 28 मे रोजी घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधला होता. त्यांच्या हातात शस्त्रे दिसतआहेत आणि ते शस्त्राच्या धाकावर हॉस्पिटलच्या कर्मचार्यांना धमकी देत आहेत. रुग्णालयातील कर्मचारी दरोडेखोरांसमोर लुटू नका अशी विनंती करत आहेत.
लूटमारीनंतर दरोडेखोर पळून गेले. यासंदर्भात डीसीपी म्हणाले की, रुग्णालयाकडून कोणतीही लेखी तक्रार आली नाही. तरीही पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. डीसीपीने असा दावा केला आहे की, लवकरच दरोडेखोरांना ओळखून अटक केली जाईल.
बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे ताब्यात