"बाबा मला जगायचंय, पण टोमणे जगू देत नाहीत!", सुसाईट नोट लिहून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
By पूनम अपराज | Published: December 17, 2020 09:35 PM2020-12-17T21:35:33+5:302020-12-17T21:36:14+5:30
Suicide : आत्महत्येपूर्वी तिने आत्महत्येची चिठ्ठी लिहून आई-वडिलांची क्षमा मागितली आहे आणि आत्महत्येसाठी मामा आणि एका युवकाला जबाबदार धरले आहे.
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात बुधवारी रात्री एका अल्पवयीन विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आत्महत्येची चिठ्ठी लिहून आई-वडिलांची क्षमा मागितली आहे आणि आत्महत्येसाठी मामा आणि एका युवकाला जबाबदार धरले आहे. तिने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की, संबंधित युवकामुळे आणखी दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे.
त्याच वेळी मी माझ्या मामा-मामीलाला इशारा दिला की, आजपासून तुमची वाईट वेळ सुरू होते, जर तुम्ही माझ्या आई आणि वडिलांना काही सांगाल तर समजून जा... या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या भाच्याविरूद्ध नगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची पत्नी व गडवार पोलिस स्टेशन परिसरातील कुरेजी येथे राहणाऱ्या मनीषविरोधात गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरा पोलीस ठाणे परिसरातील खेड्यातील एका अल्पवयीन मुलीला त्याच पोलिस स्टेशन परिसरातील गावात राहणारा मामा आहे. ननिहालमध्ये सण-उत्सवाच्या दिवशी मुलगी ननिहालला गेली होती. बुधवारी तिच्या गावी आली. रात्री कुटुंबियातील सदस्य झोपल्यानंतर तिने विषारी पदार्थ खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला.
सकाळी कुटुंबीयांनी आत्महत्येची नोंद केली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. मुलीच्या मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाइड नोट सापडली आहे.
त्यात तिने आपल्या आई आणि वडिलांना कधीही त्रास होणार नाही, असे लिहून आपल्या मृत्यूसाठी दोषी असलेल्या आपल्या मामा आणि एका तरूणाबाबाबत सांगितले. तसेच, मी माझ्या आई - वडिलांना निराश होऊ देणार नाही. तसेच मामा - मामीला कधीच सुखी होऊ देणार नाही. तरूणामुळे दोन मुलींनी आपले प्राण गमावले असल्याचे देखील सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. या मुलीने युवकाचे नाव आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहित असे लिहिले आहे की, जर तू माझे ऐकले असते तर मी या जगात असते.
मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्याचे नगरा पोलिस स्टेशनचे विवेक पांडे यांनी सांगितले. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. लवकरच सत्य उजेडात आणले जाईल.