डान्स शिकायला आलेल्या तरुणीला शीतपेयात टाकून दिले गुंगीचे औषध अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:50 PM2019-11-26T13:50:01+5:302019-11-26T13:52:13+5:30

याप्रकरणी पोलिसांनी डान्स शिक्षकाला अटक केली आहे.

Dance teacher mixed drug in cold drink and gave to the girl who came to learn dance and ... | डान्स शिकायला आलेल्या तरुणीला शीतपेयात टाकून दिले गुंगीचे औषध अन्...

डान्स शिकायला आलेल्या तरुणीला शीतपेयात टाकून दिले गुंगीचे औषध अन्...

Next
ठळक मुद्देब्लॅकमेल करून डान्स शिक्षकाने तरुणींकडून दागदागिने आणि दीड लाख रुपये वसूल केले. जवळपास ४ महिने आरोपी शिक्षक पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता.शेवटी कंटाळून पीडित तरुणीने ही घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली.

राजस्थान - एका डान्स शिक्षकाने शीतपेयात गुंगीचे औषध टाकून डान्स शिकायला आलेल्या तरुणीला दिले आणि व्हिडीओ बनवला. नंतर व्हिडिओने तो तिला ब्लॅकमेल करू लागला. ब्लॅकमेल करून डान्स शिक्षकाने तरुणींकडून दागदागिने आणि दीड लाख रुपये वसूल केले. याप्रकरणी पोलिसांनी डान्स शिक्षकाला अटक केली आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. 

पीडित तरुणी १० वी इयत्तेत शिकते. डान्स शिक्षक शाळेत डान्स शिकवता शिकवता स्वतःची डान्स अकॅडमी सुद्धा चालवतो. ऑगस्ट महिन्यात पीडित तरुणीला डान्स शिकायच्या बहाण्याने आपल्या खाजगी अकॅडमीमध्ये त्याने बोलाविले. त्या शिक्षकाने मुलीला शीतपेयाच्या गुंगीचे औषध टाकून दिले. ते प्यायलानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचे तरुणीच्या अंगावरील कपडे काढून त्याने व्हिडीओ आणि काही फोटो काढले. अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवून तो तिला सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर तो तरुणीकडे वारंवार पैशांची मागणी करू लागला. जवळपास ४ महिने आरोपी शिक्षक पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. घाबरून तरुणीने दागिने आणि जवळपास दीड लाख रुपये दिले. शेवटी कंटाळून पीडित तरुणीने ही घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यांनतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Web Title: Dance teacher mixed drug in cold drink and gave to the girl who came to learn dance and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.