लव्ह मॅरेजचा भयंकर शेवट! पत्नीला खुर्चीला बांधले, बेदम मारले त्यानंतर कायमचं संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:10 AM2024-08-29T11:10:24+5:302024-08-29T11:12:22+5:30
बंगळुरूतील डान्स टिचर असलेल्या २८ वर्षीय युवतीची तिच्या राहत्या घरी हत्या
बंगळुरू - कर्नाटकच्या बंगळुरू इथं बुधवारी २८ वर्षीय डान्स टिचरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. डान्स टिचर नव्याश्रीला पतीनं गळा दाबून ठार केले. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती किरणला अटक केली आहे. किरणने आधी पत्नीला खुर्चीला बांधले त्यानंतर तिला बेदम मारले. हत्येच्यावेळी नव्याश्रीची मैत्रिण ऐश्वर्याही तिथेच होती. सकाळी ६ वाजता ऐश्वर्या झोपून उठली तेव्हा नव्याश्रीचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. घाबरून तिने आरडाओरड सुरू केली तेव्हा हा प्रकार समोर आला.
घरात भीती वाटतेय, मित्रांना सांगितलं
ऐश्वर्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून कळवले. पोलिसांच्या माहितीनुसार, नव्याश्रीचा पती किरणला अटक करण्यात आली आहे. किरण आणि नव्याश्री यांच्यात दररोज भांडणे व्हायची. किरणला नव्याश्रीच्या चारित्र्यावर संशय होता. नव्याश्रीला घरात कायम भीती वाटायची. याबाबत तिने मित्रमैत्रिणींना सांगितले होते. मंगळवारी नव्याश्री मैत्रिण ऐश्वर्या आणि मित्र अनिलला भेटली तेव्हाही तिने हे सांगितले. त्या रात्री ऐश्वर्या नव्याश्रीसोबत तिच्याच घरी थांबली होती.
रात्री दोघांनी प्यायली बिअर
बुधवारी सकाळी जेव्हा ऐश्वर्याचा डोळा उघडला तेव्हा तिचे कपडे ओले होते. नव्याश्री तिथेच पडली होती. ऐश्वर्याने किरण आणि नव्याश्रीमधील भांडणाबाबत पोलिसांना सांगितले. मंगळवारी रात्री नव्याश्री आणि ऐश्वर्याने बिअर प्यायली होती. त्यानंतर दोघीही गाढ झोपेत गेल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास किरण दुसऱ्या चावीने घरी घुसला त्याने नव्याश्रीचा गळा दाबून फरार झाला. नव्याश्री आणि किरण यांच्या लग्नाला ३ वर्ष झालेत. किरण हा टॅक्सी ड्रायव्हर होता त्याला नव्याश्रीवर संशय होता.
काय आहे प्रकरण?
किरण आणि नव्याश्री हे एकमेकांवर प्रेम करत होते, घरच्यांचा विरोध डावलून या दोघांनी प्रेमविवाह केला होता. गेल्या वर्षभरापासून या दोघांमध्ये सतत वाद होत होते. नव्याश्री डान्स टीचर असल्याने ती सोशल मीडियात खूप सक्रीय होती त्यातूनच किरणला तिच्यावर संशय वाढत गेला. किरण दररोज नव्याश्रीचा मोबाईल चेक करायचा. त्यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.