लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत सुनेने घेतला सासूचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 08:13 AM2022-04-28T08:13:05+5:302022-04-28T08:13:19+5:30

पैठणच्या पाटेगावातील  घटना : अंगावरील जखमांमुळे फुटले बिंग

Daughter in Law beaten to mother-in-law with a wooden stick | लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत सुनेने घेतला सासूचा बळी

लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत सुनेने घेतला सासूचा बळी

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद) : घरगुती कारणावरून सुनेने लाकडी दांड्याने जबर मारहाण करून सासूचा खून केल्याची घटना पैठण तालुक्यातील पाटेगावात बुधवारी घडली. विशेष म्हणजे, चक्कर येऊन पडल्याचा बनाव करीत सुनेने सासूला पैठण रुग्णालयात आणले. मात्र, अंगावरील जखमांनी या प्रकरणाचे बिंग फुटले. कौशल्याबाई अंबादास हरवणे (वय ४५) असे मयत सासूचे नाव असून, कांचन गणेश हरवणे (वय २२) असे आरोपी सुनेचे नाव आहे. याप्रकरणी पैठण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सुनेला अटक केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील वडुले (ता. शेवगाव) येथील रहिवासी कौशल्याबाई हरवणे यांनी पतीचे निधन झाल्यानंतर गाव सोडले आणि पाटेगावला राहायला आल्या. जमा केलेल्या पुंजीतून त्यांनी चार एकर जमीन खरेदी केली, तसेच मुलगा गणेश याचा विवाह कांचनसोबत थाटामाटात लावून दिला होता. काही दिवसांनंतर सून कांचन व कौशल्याबाई यांच्यात घरगुती कारणावरून वाद होऊ लागले. बुधवारी सकाळी असाच वाद झाल्याने सून कांचन हिने दांडक्याने सासू कौशल्याबाईला जबर मारहाण केली. यात डोक्याला व पाठीला जबर मार लागून कौशल्याबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

कांचन नवऱ्यालाही करायची मारहाण
कौशल्याबाई व कांचन यांच्यात नेहमी भांडण होत असे. आई व पत्नीच्या भांडणात गणेश मध्ये पडला तर कांचन त्यालाही मारहाण करायची. सततच्या या कुरबुरीने गणेशने घरातील रूम वेगळी करून आईला वेगळे केले होते. गणेश व कांचन यांना तीन व दीड वर्षांच्या दोन मुली आहेत.

Web Title: Daughter in Law beaten to mother-in-law with a wooden stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.