सासू-सासऱ्यांना जेवणातून दिल्या झोपेच्या गोळ्या अन् बॉयफ्रेंडसोबत...; सुनेचा कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:51 PM2023-03-10T12:51:05+5:302023-03-10T13:00:30+5:30

महिलेने प्रियकरासह सासू-सासऱ्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या.

daughter in law fed sleeping pill to mother in law then ran | सासू-सासऱ्यांना जेवणातून दिल्या झोपेच्या गोळ्या अन् बॉयफ्रेंडसोबत...; सुनेचा कारनामा

सासू-सासऱ्यांना जेवणातून दिल्या झोपेच्या गोळ्या अन् बॉयफ्रेंडसोबत...; सुनेचा कारनामा

googlenewsNext

राजस्थानमध्ये शाहाबाद पोलिसांनी रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी प्रियकरासह पळून गेलेल्या सुनेसह दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहाबाद पोलिसांनी रोख आणि दागिन्यांच्या चोरीप्रकरणी एका महिलेसह दोन आरोपींना अटक केली. महिलेने तिच्या प्रियकरासह सासू-सासऱ्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, त्यानंतर त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला. आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

एसपी राजकुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी पुरणचंद किराड यांनी शाहाबाद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांची सून उर्मिलाने मोरई येथील रहिवासी असलेल्या मुकेश गुर्जर आणि दिलीप यांच्या मदतीने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. 

सुनेने यानंतर पत्नीचं मंगळसूत्र, चांदीचे 3 पैंजण, सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्य़ा, सोन्याचे टॉप्स, दोन सोन्याच्या अंगठ्या व 50 हजार रुपये चोरून प्रियकरासह पळ काढला. सासऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपींनी स्टेशन ऑफिसर किरदार अहमद यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. 

याप्रकरणी पोलीस पथकाने आरोपी सून उर्मिला धाकड आणि मुकेश गुर्जर यांना ताब्यात घेतले. चौकशीत उघडकीस आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी सून उर्मिला धाकड हिच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि 2500 रुपये असा ऐवज जप्त केला आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: daughter in law fed sleeping pill to mother in law then ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.