मोबाईल परत न करणाऱ्या वडिलांची मुलीने काठीने व दगडाने केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:16 AM2021-01-28T03:16:34+5:302021-01-28T03:16:44+5:30
मुलगी आणि आईला अटक करण्यात आली, असे बेलगाहना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश चंद्रा यांनी सांगितले.सरस्वती हिच्या नवऱ्याने तिला माहेरी आणून सोडले.
बिलासपूर (छत्तीसगड) : लपवून ठेवलेला मोबाईल फोन परत न केल्यामुळे मुलगी दिव्या सरस्वती (२८) हिने वडील मंगलू राम धनूहार (५८) यांची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेह तिने आईच्या मदतीने घराच्या आवारात पुरून टाकला. ही घटना कांचनपूर खेड्यात घडली.
मुलगी आणि आईला अटक करण्यात आली, असे बेलगाहना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश चंद्रा यांनी सांगितले.सरस्वती हिच्या नवऱ्याने तिला माहेरी आणून सोडले. दुसऱ्या दिवशी तिला तिचा मोबाईल फोन सापडला नाही तेव्हा तिने वडिलांना त्याबद्दल विचारले. आधी त्यांनी मला काही माहिती नाही, असे सांगितले. पण नंतर ताे मी लपवल्याचे कबूल केले. सरस्वतीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालेले आहे.
मोबाईल देण्यास वडिलांनी नकार दिल्यावर तिने काठीने व दगडाने त्यांना निर्घृणपणे मारले. त्यात ते जागीच ठार झाले. मृतदेह पुरल्यानंतर दोघीही तेथून पळाल्याचे पोलीस म्हणाले. हा प्रकार त्यांच्या एका शेजाऱ्याने बघितला व पोलिसांना सोमवारी कळवले.