क्राइम पेट्रोल बघून केले आईचे तुकडे...; वीणा जैन हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:26 AM2023-03-18T06:26:26+5:302023-03-18T06:27:23+5:30

वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्यांची मुलगी रिम्पल हिला क्राइम पेट्रोल पाहण्याची आवड होती.

daughter liked to watch crime patrol other shocking information in veena jain case | क्राइम पेट्रोल बघून केले आईचे तुकडे...; वीणा जैन हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती 

क्राइम पेट्रोल बघून केले आईचे तुकडे...; वीणा जैन हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लालबाग येथे राहणाऱ्या वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्यांची मुलगी रिम्पल हिला क्राइम पेट्रोल पाहण्याची आवड होती. हीच गुन्हे मालिका पाहून तिने आईची हत्या करत तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

चौकशीत २७ डिसेंबरला  पहाटे वीणा नैसर्गिक विधीसाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान तेथील कठड्यावरून त्या खाली पडल्या. बराच वेळ झाला तरी आई आली नाही म्हणून मी बाहेर बघायला आली तेव्हा, तेथील एका मुलाने आई पडल्याचे सांगितले. त्यांच्या मदतीने तिला खोलीत आणले. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला आणि नातेवाईक आपल्यालाच दोषी ठरवतील म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून लपवून ठेवल्याची माहिती रिम्पलने पोलिसांना दिली. वीणा यांना उचलून घरापर्यंत नेणाऱ्या तरुणांनी आईची हालचाल होत नसून डॉक्टर तसेच नातेवाइकांना माहिती देण्यास सांगितले होते. मात्र तिने ‘मी सांगते’ म्हणत त्यांना जाण्यास सांगितले. 

पोलिसांनी त्या दोन तरुणांसह रिम्पलच्या नातेवाइकांव्यतिरिक्त संपर्कात असलेल्या सहा जणांची चौकशी करत जबाब नोंदविले आहे. तिने मेडिकलमधून फिनेल, रूम फ्रेशनरसह अनेक गोष्टी मागविल्याचे मेडिकल चालकाच्या जबाबातून समोर आले. सर्वांच्या जबाब आणि अन्य माहितीच्या आधारे २७ डिसेंबरलाच वीणा यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्या स्वतः पडल्या की त्यांना रिम्पलने ढकलले. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रिम्पलला आधीपासून गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मालिका पाहण्याची आवड होती. त्याच मालिका पाहून तिने आईची हत्या केली. त्यानंतर, जवळच्या दुकानांतून मार्बल कटर, चाकू आणि कोयत्याने तुकडे करत ते लपवून ठेवले.

उत्तर प्रदेशच्या बॉबीकडे चौकशी 

काळाचौकी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलेला बॉबी अमजद अली (२७) कडे पोलिसांची चौकशी सुरू आहे. तो त्याच परिसरात सँडविच विक्री करत होता. ती त्याच्याही सतत संपर्कात होती. त्याच्याकडून ती सँडविच मागवत होती. तो ७ जानेवरीपासून गावी होता. त्याचा यामध्ये काही सहभाग आहे का? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: daughter liked to watch crime patrol other shocking information in veena jain case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.