दाऊद कराचीमध्येच, ईडीसमोर भाचा अलीशाह पारकरने केलं कबूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:28 PM2022-05-24T13:28:35+5:302022-05-24T14:13:25+5:30

Dawood Ibrahim : दाऊदचे कुटुंब सणासुदीच्या दिवशी आमच्या संपर्कात असतात अशी देखील माहिती अलीशाहने दिल्याने खळबळ माजली आहे.      

Dawood ibrahim is in karachi,confessed by his nephew Alisha Parkar toward ED | दाऊद कराचीमध्येच, ईडीसमोर भाचा अलीशाह पारकरने केलं कबूल

दाऊद कराचीमध्येच, ईडीसमोर भाचा अलीशाह पारकरने केलं कबूल

googlenewsNext

नवी दिल्ली -  भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये लपून बसल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब खुद्द दाऊदच्या भाच्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. दाऊदचा भाचा म्हणजेच हसीना पारकरचा (Hasina Parkar)  मुलगा अलीशाह पारकर याने अंमलबजावणी संचालनालयकडे (ईडी) (ED) आपला मामा म्हणजेच कुख्यात गुंड दाऊद (Dawood) पाकिस्तानात कराचीमध्ये (Karachi)  असल्याची कबुली दिली आहे. तसेच दाऊदचे कुटुंब सणासुदीच्या दिवशी आमच्या संपर्कात होता अशी देखील माहिती अलीशाहने दिल्याने खळबळ माजली आहे.   

अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की, १९८६ ला दाऊदने भारत सोडला आणि फरार झाला. त्यांनतर जाणकर सूत्रांकडून दाऊद पाकिस्तानात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

अलीशाह पारकर याने ईडीला पुढे सांगितले की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे. दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते १९८६ पर्यंत राहत होते. मी काही स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे की, दाऊद आता कराचीमध्ये आहे. पुढे पारकर म्हणाला, जेव्हा दाऊद कराचीला गेला होता. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. आता मी किंवा माझे कुटुंब त्यांच्या संपर्कात नाही. होय, पण कधी-कधी ईद, दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाच्या निमित्ताने कुटुंबीय दाऊद इब्राहिमच्या संपर्कात होतं. दाऊद माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतो.

दाऊद इब्राहिम भारतातील अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये वॉण्टेड असून, त्याचा अनेक दिवसांपासून शोध सुरू आहे. यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 13 मे रोजी शहराच्या पश्चिम उपनगरातून गँगस्टर छोटा शकीलच्या दोन साथीदारांना फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमद्वारे चालवल्या जाणार्‍या गुन्हेगारी सिंडिकेटचे बेकायदेशीर कारवाया आणि आर्थिक व्यवहार हाताळल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर अबुबकर शेख (51) अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: Dawood ibrahim is in karachi,confessed by his nephew Alisha Parkar toward ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.