सांगलीत भरदिवसा रिलायन्स ज्वेलवर दरोडा; कोट्यवधीचे सोने-चांदी लुटले

By शीतल पाटील | Published: June 4, 2023 05:25 PM2023-06-04T17:25:44+5:302023-06-04T17:26:02+5:30

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

Daylight robbery at Reliance Jewel in Sangli; Crores of gold and silver were looted | सांगलीत भरदिवसा रिलायन्स ज्वेलवर दरोडा; कोट्यवधीचे सोने-चांदी लुटले

सांगलीत भरदिवसा रिलायन्स ज्वेलवर दरोडा; कोट्यवधीचे सोने-चांदी लुटले

googlenewsNext

सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर पाच ते सहा दरोडेखोरांना भरदिवसा दरोडा टाकत कोट्यवधीचे सोने-चांदी लुटून नेले. दरोडेखोरांना गोळीबारही केला. शोरूममधील कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले होते. सिनेस्टाईलने दरोडेखोरांनी सोने-चांदीचे दुकान लुटल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

सांगली-मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळ रिलायन्स ज्वेल्स नावाचे सोन्या-चांदीचे शोरूम आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर ग्राहक म्हणून शोरूम शिरले. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. रिव्हाॅल्वरचा धाक दाखवित दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून घातले. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. काही ग्राहकांनाही दरोडेखोरांना धमकी दिली. ज्वेल्सच्या व्यवस्थापकाला मारहाणही केल्याचे समजते. त्यानंतर दुकानाच्या शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने सोबत आणलेल्या बॅगेत भरले. 

एका ग्राहकाने दरोडेखोराशी वाद घातल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी एक काडसूत पडलेली होती. शोरूमच्या काचाही फुटलेल्या होत्या. सोने-चांदीची लुट करून दरोडेखोर सफारी गाडीतून पसार झाले. दरोडेखोरांनी शोरूमधील सीसीटीव्हीचा डीसीआरही सोबत नसल्याचे समजते. तब्बल तासभर शोरूममध्ये चोरीचा प्रकार सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Web Title: Daylight robbery at Reliance Jewel in Sangli; Crores of gold and silver were looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.