हॉटेलच्या खोलीत आढळला एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह; २ जुळ्या मुलींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 04:30 PM2023-04-01T16:30:37+5:302023-04-01T16:31:01+5:30

मृत मैसूरला राहणारे होते. पती देवेंद्र, पत्नी निर्मला, ९ वर्षीय जुळ्या मुली चैत्रा आणि चैतन्या असं मृतकांची नावे आहेत.

Dead bodies of four from the same family found in hotel room; Including 2 twin girls | हॉटेलच्या खोलीत आढळला एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह; २ जुळ्या मुलींचा समावेश

हॉटेलच्या खोलीत आढळला एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह; २ जुळ्या मुलींचा समावेश

googlenewsNext

मंगळुरू - कर्नाटकात मंगळुरू येथील लॉजमध्ये २ मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हॉटेलमधील या मृतदेहाबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आर्थिक त्रासाला कंटाळून कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मैसूरला राहणारे असून पती देवेंद्र, पत्नी निर्मला, ९ वर्षीय जुळ्या मुली चैत्रा आणि चैतन्या असं मृतकांची नावे आहेत. शुक्रवारी या कुटुंबाचे हॉटेलमधून चेकआऊट होणार होते परंतु कुटुंब बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचारी दरवाजा ठोठवण्यासाठी गेला. मात्र दरवाजा उघडलाच नाही. तेव्हा कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता या प्रकरणाचा खुलासा झाला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी हॉटेलला पोहचले. 

आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या?
पोलिसांनी म्हटलं की, आर्थिक त्रासाला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. देवेंद्रने त्याच्या मुलींना विष पाजून मारले त्यानंतर पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि स्वत:नेही गळफास घेतला. २७ मार्चला या कुटुंबाने हॉटेलमध्ये भाड्याने रुम घेतली होती. ३० मार्चला ही रूम खाली करायची होती. तेव्हा हा प्रकार उघड झाला. देवेंद्रचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला तर पत्नी, जुळ्या मुलींचा मृतदेह बेडवर पडला होता. 

घटनास्थळी सापडली सुसाईड नोट
पोलिसांनी तपास केला असता सुसाईड नोटही आढळली त्यात आर्थिक संकटात अडकल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं आहे. तरीही पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. 

Web Title: Dead bodies of four from the same family found in hotel room; Including 2 twin girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.