एकाच कुटुंबातील तिघांचे सापडले मृतदेह; घरात आढळल्या झोपेच्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:03 PM2021-09-07T17:03:10+5:302021-09-07T17:04:32+5:30

Suicide Case : सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा रोड परिसरातील नवीन नगर पोलिस करत आहेत.

The dead bodies of three members of the same family were found; Sleeping pills found in the house | एकाच कुटुंबातील तिघांचे सापडले मृतदेह; घरात आढळल्या झोपेच्या गोळ्या

एकाच कुटुंबातील तिघांचे सापडले मृतदेह; घरात आढळल्या झोपेच्या गोळ्या

Next
ठळक मुद्देनसरीन वाघू (47), मुलगी सय्यद नाझ (21) आणि मुलगा मोहम्मद अर्श (13) अशी मृतांची नावे आहेत.

मीरा रोड परिसरात एकाच कुटुंबातील तीन लोकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या आत्महत्यांमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये आई, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. मीरा रोडव येथील नरेंद्र पार्क पार्क कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत ही धक्कादायक घटना घडली.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा रोड परिसरातील नवीन नगर पोलिस करत आहेत. तिन्ही मृतदेह पोलिसांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरीन वाघू (47), मुलगी सय्यद नाझ (21) आणि मुलगा मोहम्मद अर्श (13) अशी मृतांची नावे आहेत.



दोन्ही मुले मतिमंद होती
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी दोघेही मतिमंद होते, सकाळी 10 वाजता मृतांची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत पावलेल्या महिलेला पती खूप पूर्वी सोडून गेला होता. तेव्हापासून हे कुटुंब त्यांच्या आजी -आजोबांच्या घरी राहत होते.

आई आणि मुलामध्ये भांडण
मृत मुलांच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी दुपारी आई आणि मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर तिघेही रात्री एकत्र झोपले. मात्र, सकाळी तिघांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात काही झोपेच्या गोळ्याही सापडल्या आहेत.

Web Title: The dead bodies of three members of the same family were found; Sleeping pills found in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.