सूटकेसमध्ये मृतदेह, शिर गायब, तब्बल १ वर्षांनी झाला हत्येचा खुलासा; पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:48 PM2022-10-05T15:48:37+5:302022-10-05T15:49:01+5:30

सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

Dead body in suitcase, head missing, murder revealed after almost 1 year; The vasai police were shocked | सूटकेसमध्ये मृतदेह, शिर गायब, तब्बल १ वर्षांनी झाला हत्येचा खुलासा; पोलीस हादरले

सूटकेसमध्ये मृतदेह, शिर गायब, तब्बल १ वर्षांनी झाला हत्येचा खुलासा; पोलीस हादरले

googlenewsNext

मुंबई - वसई येथील एका बीचवर शिर नसलेला मृतदेह सापडला. हा मृतदेह एका मुलीचा होता. जिला काळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बंद केले होते. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला त्याचसोबत मृतदेहाचं शिर शोधण्याचे प्रयत्न सुरु केले. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलीस तपासातील मोठं आव्हान होते. या घटनेला १ वर्ष झाले परंतु पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. मात्र त्यानंतर अचानक एक व्यक्ती मुलीचा शोध घेत पोलीस स्टेशनला पोहचतो त्यानंतर शिर नसलेल्या मृतदेहाचं भयानक रहस्य ऐकून सर्वच हादरतात. 

२६ जुलै २०२१ वसई 
त्यादिवशी वसईच्या भूईगाव बीचवर चिखलात काळ्या रंगाची मोठी सूटकेस सापडते. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहचते. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पहिल्याच नजरेत हे सगळं संशयास्पद वाटतं कारण निर्जनस्थळी बीचवर अशी सूटकेस सापडते. या सूटकेसमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो मात्र तो मृतदेह शिर नसलेला असतो. 

हत्येचा गुन्हा दाखल
प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर वसई पोलिसांनी आयपीसी ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करतात. परंतु खूप प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. याचवेळी पोलीस मृतदेह, सूटकेस, मृतदेहावरील कपडे यांचे विविध फोटो राज्यभर पसरवतं. जेणेकरून फोटोवरून पोलिसांना पुरावा हाती लागेल. मात्र काहीच फायदा होत नाही. पोलीस मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून डीएनए सॅम्पल सुरक्षित ठेवते. या तपासाला १ वर्ष पूर्ण होतात. मात्र मृतदेह कुणाचा याचा सुगावा लागत नाही. 

मुलीच्या शोधात कुटुंब मुंबईत येतं
कर्नाटकमधून एक कुटुंब मुलीच्या शोधात मुंबईत पोहचतं. या मुलीचं नाव सानिया शेख असं होतं. जिचं लग्न नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आसिफ शेखसोबत झाले होते. सोनिया लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं निधन झालं होते. तिला काका-काकीने वाढवलं होते. मागील १ वर्षापासून काका पुतणीसोबत फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. जावई आसिफला फोन केला तर तो रॉंग नंबर म्हणून कट करत होता. 

जेव्हा सानियाचे नातेवाईक नालासोपाऱ्याला मुलीच्या शोधात गेले तेव्हा आसिफ आणि तिचं कुटुंब तिथे राहत नसल्याचं पुढे आले. त्यानंतर सानियाच्या काकांनी प्रयत्न केल्यानंतर आसिफ आणि त्याच्या आईशी बोलणं झाले. त्यांनी नालासोपाऱ्याची संपत्ती विकून मुंब्रा इथे राहायला गेल्याचं म्हटलं. जेव्हा मुंब्रा येथे सानियाचे नातेवाईक पोहचले तेव्हा आसिफ आणि लहान मुलगी दिसली परंतु सानिया दिसली नाही. सानिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचं सासरच्या मंडळींनी सांगितले. परंतु त्याबाबत सानियाच्या नवऱ्याने तक्रारही दाखल केली नसल्याने कुटुंबाला संशय आला. 

त्यानंतर सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी वसई येथील मृतदेहाचे फोटो दाखवले ते सानियाच्या नवऱ्याने आणि सासरकडील लोकांनी ओळख पटवण्यास नकार दिला. परंतु जेव्हा हे फोटो सानियाच्या नातेवाईकांनी पाहिले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहावरील कपडे आणि अन्य खूणांमुळे ओळख पटली. पोलिसांनी अधिक तपास केला असता सासरकडच्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यात सुरुवात केली. मात्र खाकीचा हिसका दाखवताच नवऱ्याने सत्य उलगडलं. आसिफनं वडील हनीफ, भाऊ यासीनसोबत मिळून आधी सानियाचे हात पाय बांधून तिला पाण्याच्या टबात टाकलं. त्यात बुडल्यामुळे तिचा जीव गेला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपी वडिलांनी सानियाचं शिर धडापासून वेगळे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. मुलीला दत्तक देण्यावरून आसिफ सानियात वाद झाला होता. त्यावरून आसिफने सानियाला संपवलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Dead body in suitcase, head missing, murder revealed after almost 1 year; The vasai police were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.