बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह विळेगावात आढळला

By राजकुमार जोंधळे | Updated: October 10, 2023 00:53 IST2023-10-10T00:53:14+5:302023-10-10T00:53:29+5:30

१९ वर्षीय विवाहित महिलाेचे नाव अर्चना सत्यवान तरोडे

Dead body of missing married woman found in Vilegaon | बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह विळेगावात आढळला

बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह विळेगावात आढळला

राजकुमार जाेंधळे, किनगाव (जि. लातूर): घरात काेणालाही न सांगता बाहेर पडलेली महिला घराकडे परतलीच नाही, तिचा मृतदेह काजळ हिप्परगा शिवारात एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, विळेगाव (ता. अहमदपूर) येथील १९ वर्षीय विवाहित महिला अर्चना सत्यवान तरोडे (वय १९) ही ६ ऑक्टाेबर राेजी सायंकळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घरात काेणाला काहीही न सांगता घराबाहेर पडली. ती पुन्हा घराकडे परतली नाही. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र, नातेवाईकांकडे शाेध घेतला मात्र ती आढळून आली नाही. साेमवारी सकाळी अहमदपूर तालुक्यातील काजळहिप्परगा शिवारातील एका विहिरीत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात सत्यवान अंकूश तराेडे (वय २२) यांनी दिलेल्या माहितीवरुन नाेंद केली आहे. तपास सहाय्यक फौजदार कल्याणे करत आहेत.

Web Title: Dead body of missing married woman found in Vilegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर