वरळी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांना गळ्याभोवती आढळला व्रण

By पूनम अपराज | Published: December 26, 2020 09:22 PM2020-12-26T21:22:35+5:302020-12-26T21:23:58+5:30

Murder : या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Dead Body of women found in worli | वरळी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांना गळ्याभोवती आढळला व्रण

वरळी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांना गळ्याभोवती आढळला व्रण

Next
ठळक मुद्दे वरळी परिसरातील जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये शिखा ही राहत होती. गुरूवारी रात्री शिबु भौमिक याच्यासोबत तिला शेवटचे अनेकांनी पाहिले असल्याचं निष्पन्न झालं आहे.

वरळी परिसरात एका ४४ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शिखा नारायण मंडल असे या मृत महिलेचे नाव आहे. वरळीच्या जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


वरळी परिसरातील जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये शिखा ही राहत होती. गुरूवारी रात्री शिबु भौमिक याच्यासोबत तिला शेवटचे अनेकांनी पाहिले असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी शिखा रक्ताच्या थारोळ्यात लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली. याची माहिती स्थानिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी वरळी पोलिसांचे पथक दाखल झाले.

शिखाच्या गळ्याभोवती एक व्रण आढळून आला आहे. तसेच तिच्या नाकावर आणि कपाळावर हत्याराने वार केले असल्याचे देखील दिसून आले आहे. शिखाला तातडीने नायर रुग्णालयात नेले असता. तिचा मृत्यू झाला असल्याचे डाँक्टरांनी घोषित केले. शिखाच्या हत्येचे कारण अद्याप पुढे आले नसून पोलिसांनी संशयित आरोपी शिबु भौमिक विरोधात ३०२ भा.द.वि कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरळी पोलीस शिबुचा शोध घेत आहेत.

Web Title: Dead Body of women found in worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.