कुत्र्याला घाबरून पळ काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:54 PM2021-06-28T21:54:14+5:302021-06-28T22:00:15+5:30
Dead Case : मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात बेजाबदारीबाबत तक्रार दाखल केली आहे.
फरिदाबाद - सैनिक कॉलनीतील अचिवर्स सोसायटीत राहणाऱ्या एका खासगी इन्शूरन्स कंपनीच्या सीनियर एक्झिक्युटिव्हला शेजारच्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला आहे. कुत्रा त्यांच्या मागे लागल्यानंतर ती व्यक्ती घाबरली आणि पळत सुटली. त्यामुळे त्यांचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात बेजाबदारीबाबत तक्रार दाखल केली आहे.
अचिवर्स सोसायटीतील गिरीश स्वरुप माथूर (७५) कुटुंबासह सहाव्या मजल्यावर राहतात. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मुलगा समीर (४०) घरीच होता. तो एक खासगी इन्शुरन्स कंपनीत सीनिअर एक्झिक्युटिव्ह होते. ते पायऱ्यांवरून खाली उतरत होते. जेव्हा ते चौथ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा शेजारील राहणाऱ्या संजीव भदौरिया यांचा पाळीव कुत्रा जर्मन शेफर्ड समीरच्या मागे पळू लागला.
समीर कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळत असताना तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले. वडील गिरीश माथुर यांचा आरोप आहे की, या प्रकरणात त्यांचा मुलगा समीरचा मृत्यू शेजारील संजीव भदौरियाने पाळीव कुत्रा जर्मन शेफर्डमुळे झाला आहे. कारण संजीव भदौरियाने आपल्या फ्लॅटचा दरवाजा आणि कुत्रा दोन्ही खुला ठेवला होता.