विष प्यायलेल्या विवाहितेला घरातच ठेवल्याने मृत्यू; पतीसह सासूविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 08:43 AM2022-02-14T08:43:04+5:302022-02-14T08:43:18+5:30

वेदना असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी तिने आपण विष प्यायल्याची माहिती फोनवरून आईला दिली. 

Death by keeping poisoned married woman at home; Crime against husband and mother-in-law | विष प्यायलेल्या विवाहितेला घरातच ठेवल्याने मृत्यू; पतीसह सासूविरोधात गुन्हा

विष प्यायलेल्या विवाहितेला घरातच ठेवल्याने मृत्यू; पतीसह सासूविरोधात गुन्हा

Next

नवी मुंबई : सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्यायलेल्या विवाहितेला उपचारासाठी देखील मदत न करता घरातच ठेवल्याची घटना समोर आली आहे. अखेर दोन दिवसांनी विवाहितेनेच आपण विष प्यायल्याने माहेरच्यांना कळविल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण अंगात विष पसरल्याने उपचारादरम्यान १५ दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

कोपरखैरणे सेक्टर १२ डी येथे राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडला आहे. मानसी भगत (३६) असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून ती मूळची बुलढाणा येथील गवई कुटुंबातील आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचा विवाह कोपरखैरणे येथे राहणाऱ्या अजय योगीराज भगत याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर मानसी ही कोपरखैरणेत पती व सासू कमलाबाई यांच्यासह राहायला होती. मात्र, लग्नाच्या एक महिन्यानंतरच तिला पती व सासूकडून त्रास देण्यास सुरुवात झाली होती. याबाबत ती माहेरच्यांकडे सतत तक्रार करत होती. त्यावरून तिच्या माहेरच्यांनी मानसी हिच्या सासरी येऊन त्यांची समजूत देखील काढली होती. त्यानंतरही छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला मानसी कंटाळली होती. या त्रासातून सुटकेसाठी तिने १४ जानेवारीला उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला असतानाही पती व सासूने तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन न जाता तिच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर विषारी औषध शरीरात पसरू लागले असता मानसीचा त्रासदेखील वाढू लागला. 

रुग्णालयांनी दाखल करण्यास दिला नकार
वेदना असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी तिने आपण विष प्यायल्याची माहिती फोनवरून आईला दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील मावशीने मानसीच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तीन ठिकाणी रुग्णालयात नेऊनही वेगवेगळ्या कारणांनी तिला दाखल करून घेतले नाही. अखेर २० जानेवारीला तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू झाले. संपूर्ण शरीरात विष पसरले होते. यामुळे २९ जानेवारीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Web Title: Death by keeping poisoned married woman at home; Crime against husband and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.