सीबीआयच्या माजी संचालकांचा मृत्यू; राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले

By पूनम अपराज | Published: October 7, 2020 09:40 PM2020-10-07T21:40:16+5:302020-10-07T22:08:23+5:30

Suicide : शिमला येथील 70 वर्षीय अश्विनी कुमार आपल्या रहात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.

Death of former CBI director; Found strangled in the residential room | सीबीआयच्या माजी संचालकांचा मृत्यू; राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले

सीबीआयच्या माजी संचालकांचा मृत्यू; राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले

Next
ठळक मुद्देएसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे.प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही.

शिमला - मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांचे बुधवारी निधन झाले. शिमला येथील 70 वर्षीय अश्विनी कुमार आपल्या रहात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. एसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही. हिमाचलच्या सिरमौर येथे राहणारे अश्विनी कुमार ही 1973 बॅचचे आयपीएस अधिकारी होती. सीबीआयचे संचालक, हिमाचल प्रदेशचे डीजीपी याच्यासह अनेक पदांवर त्यांनी कामगिरी वाजवली आहे.

हिमाचल पोलिसात डीजीपी असताना कित्येक मोठ्या सुधारणा केल्या
2006 साली हिमाचल प्रदेश पोलिसांच्या डीजीपीचा कार्यभार घेतल्यानंतर अश्विनी यांनी येथे अनेक सुधारणा केल्या. हिमाचल पोलिसांचे डिजिटलायझेशन आणि स्टेशन स्तरावर संगणकाचा वापर त्यांनी सुरू केला. त्यांच्या कारकिर्दीतच तक्रारींची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली, यामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना पोलिस ठाण्यात धाव न घेता ऑनलाईन तक्रार देणं सोईस्कर झालं.

सीबीआयचे संचालक होणारे हिमाचलचे पहिले पोलिस अधिकारी
अश्विनी कुमार जुलै २००८ मध्ये सीबीआय संचालक बनले होते. अश्विनी हिमाचल प्रदेशातील सीबीआय संचालक म्हणून काम करणारी पहिली पोलिस अधिकारी होते. मे २०१३ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने प्रथम त्यांना नागालँडचे राज्यपाल केले आणि त्यानंतर जुलै २०१३ मध्ये त्यांना मणिपूरचे राज्यपाल देखील केले होते.

Read in English

Web Title: Death of former CBI director; Found strangled in the residential room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.