गँगरेप झालेल्या तरुणीचा मृत्यू; गरोदर असलेल्या पीडितेने मृत बाळाला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 09:10 PM2021-12-16T21:10:30+5:302021-12-16T21:17:39+5:30
Gangrape Case : याआधी मुख्य आरोपी करणला ६ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करण, लेखपाल रणजीत बरवार आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केली होती.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेपप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या चुलत भावाचाही या सामूहिक बलात्कारात सहभाग होता. आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन आहेत. त्याचवेळी अटक केलेल्या लेखपालला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याआधी मुख्य आरोपी करणला ६ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करण, लेखपाल रणजीत बरवार आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. लाला लजपत राय हॉस्पिटलच्या प्रसूती विभागात पीडितेला दाखल करण्यात आलं होतं.
या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीने आपल्या मुलीला आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि ती गरोदर असताना तिच्यावर बाळाचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप वडिलांनी केला होता. अल्पवयीन मुलीने आपल्या काकीला सांगितलं होतं की, आरोपी दारूच्या नशेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असत. गुन्हा दाखल केल्यानंतर काकवानचे पोलीस निरीक्षक कृष्ण कुमार कश्यप यांनी कारवाई केली नाही. नंतर एसपी (पोलीस अधीक्षक) आऊटर अजित सिन्हा यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर आरोपी करणला पोलिसांनी अटक केली. बुधवारी अल्पवयीन मुलीने मृत बाळाला जन्म दिला आणि प्रसूतीदरम्यान तिचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी लेखपाल रणजीत बारवार याला रात्री उशिरा अटक केली आणि चौकशीनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
बुधवारी सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी लेखपाल रणजीतला न्यायालयात हजर केले आणि तुरुंगात रवानगी करण्यात आले. या प्रकरणी एसपी आऊटर अजित सिन्हा यांनी सांगितले की, डीएनए चाचणीचे नमुने हैदराबादमधील डीएनए फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातील. यामध्ये मृत आणि नवजात अर्भकाच्या रक्ताचे नमुने याशिवाय अटक आरोपी, संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत. नमुन्याचा अहवाल लवकरात लवकर मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. याप्रकरणी मुलगी गरोदर असल्याचं त्यांना १० ऑक्टोबर रोजी समजल असल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. त्याचवेळी पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या वडिलांचीही चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती नसल्याचे सांगितलं. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच याची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलगी लेखपालच्या संपर्कात कशी आली हे माहीत नाही, असे देखी वडिलांनी पुढे सांगितले.
काय सांगता! चोरट्याने थेट बिट चौकीतूनच पळवला पोलिसाचा लॅपटॉप; सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद
५ वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने वायरने गळा आवळून केली हत्या अन् गोणीत लपवला मृतदेह
तसेच वडिलांनी पोलिसांना माहिती दिली की, करण आणि इतर दोघे नातेवाईक आहेत आणि त्यांचं घरी येणं-जाणं असायचे. नातेसंबंधात असल्यामुळे तो असं काही वाईट कृत्य करू शकेल असं कधीच वाटलं नव्हतं. मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितलं की, आपण मजुरीचे काम करतो आणि पीडितेच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मृत अल्पवयीन मुलीला एक भाऊ देखील आहे. आता आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा मिळेल असं वडिलांना वाटत आहे.