फाशीची शिक्षा! सेप्टिक टँकमध्ये सापडलेल्या 9 वर्षीय मुलीच्या बलात्कार, हत्याप्रकरणी कोर्टाने दिला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 09:14 PM2022-06-03T21:14:13+5:302022-06-03T21:15:19+5:30
Death Panalty : तिचा मृतदेह तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टाकीत सापडला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने २०१९ मध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी निकाल जाहीर केला आहे. २०१९ मध्ये एका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. नंतर सेप्टिक टँकमध्ये मुलीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी दोषी आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. दोषी आरोपीचे नाव गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्र (३३) असे आहे. एप्रिल 2019 मध्ये जुहू परिसरातून मुलीचे अपहरण झाल्यानंतर काही दिवसांनी तिचा मृतदेह तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टाकीत सापडला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नऊ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी गुरुवारी केली होती. विशेष पॉक्सो न्यायाधीशांनी मंगळवारी देवेंद्रला दोषी ठरवले होते आणि शिक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली होती.
Maharashtra | Dindoshi court in Mumbai awards the death penalty to convict Gudappa Chinnatambi Devendra in connection with the rape of a 9-year-old girl after she was kidnapped by the convict in Juhu area in April 2019. Her dead body was later found in a sewer: Mumbai Police
— ANI (@ANI) June 3, 2022
आणखी एका बलात्कार आणि हत्या प्रकरणात, दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी एका ४५ वर्षीय दोषी आरोपाला फाशीची शिक्षा सुनावली. सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईतील साकीनाका परिसरात ३४ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी तो दोषी आढळला होता. आरोपी मोहन चौहान न्यायालयाने 30 मे रोजी भादंवि कलम 302 (हत्या), 376 (बलात्कार) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदीनुसार दोषी ठरवले होते. फिर्यादी पक्षाने चौहानला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीने हल्ल्यादरम्यान लोखंडी रॉडचा वापर केला होता. आदेशात न्यायालयाने ही घटना अमानवीय असल्याचे म्हटले आहे.