... अन्यथा जीव गमवावा लागेल! विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 05:36 PM2022-02-17T17:36:52+5:302022-02-17T17:37:33+5:30

Threats to Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

Death threats against Vivek Agnihotri, the reason behind 'The Kashmir Files' movie | ... अन्यथा जीव गमवावा लागेल! विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या

... अन्यथा जीव गमवावा लागेल! विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या

Next

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमक्या येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. विवेक यांचा 'द काश्मीर फाइल्स'चे अमेरिकेत ३० हून अधिक वेळा  स्क्रीनिंग झालं आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच ११ मार्च रोजी भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यावर्षी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'द काश्मीर फाइल्स'चे पोस्टर अमेरिकेतील बिग अॅपलच्या टाइम्स स्क्वेअर टॉवरवर लावण्यात आले होते.

'द काश्मीर फाईल्स' ही काश्मिरी पंडित समाजाच्या हत्याकांडात बळी पडलेल्या पहिल्या पिढीतील  पीडितांच्या डॉक्यूमेंटेड फुटेज आणि व्हिडिओ मुलाखतींवर आधारित सत्य कथा आहे, जी काश्मीरमधून या समुदायाच्या मोठ्या प्रमाणात पलायनाची माहिती देते. ETimes च्या वृत्तानुसार, विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

विवेक अग्निहोत्री यांना धमकीचे फोन
एका व्यक्तीने खुलासा केला की, “विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाइल्स यूएसमध्ये ३० पेक्षा जास्त वेळा दाखवला गेला आहे. भारतीय चित्रपटगृहात हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. विवेक यांना अमेरिकेतील स्क्रीनिंग थांबवण्यासाठी धमकीचे फोनही आले होते, ज्याकडे त्याने लक्ष दिले नाही. मात्र आता अचानक धमकीचे फोन आणि मेसेज सातत्याने येत आहेत. अनेकांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करू नका, अन्यथा त्यांना आपला जीव गमवावा लागेल."

 

Web Title: Death threats against Vivek Agnihotri, the reason behind 'The Kashmir Files' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.