पाण्याच्या टॅंकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त जमावाकडून रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:26 PM2018-10-29T20:26:40+5:302018-10-29T20:29:24+5:30

नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरात मोहम्मद आफताब सिद्दीकी (वय २३) हा तरूण राहतो. तो वाकणपाडा येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत शिंप्याचे काम करतो. सोमवारी सकाळी तो कंपनीत कामानिमित्त जाण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या मोटारसायकलीवरून निघाला होता.

The death of the young man in the tinker of water, stop the road from angry crowd | पाण्याच्या टॅंकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त जमावाकडून रास्ता रोको

पाण्याच्या टॅंकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त जमावाकडून रास्ता रोको

Next

नालासोपारा - भरधाव वेगाने धावणाऱ्या एका पाण्याच्या टॅंकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथे ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. 

नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरात मोहम्मद आफताब सिद्दीकी (वय २३) हा तरूण राहतो. तो वाकणपाडा येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत शिंप्याचे काम करतो. सोमवारी सकाळी तो कंपनीत कामानिमित्त जाण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या मोटारसायकलीवरून निघाला होता. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गावराई पाडा येथे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टॅंकरने त्याला धडक दिली. या धडकेत मोहम्मद जबर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. अपघातानंतर टॅंकरचालक घटनास्थळावरून फरार झाला. संतप्त नागरिकांनी टॅंकरची मोडतोड केली आणि रास्ता रोको केला. मृत मोहम्मद सिद्दीकीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून लोकांनी निदर्शने केली.

Web Title: The death of the young man in the tinker of water, stop the road from angry crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.