कर्जबाजारी रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:45 PM2020-05-13T22:45:34+5:302020-05-13T22:48:31+5:30
सलग दोन दिवस परिसरात घडू लागलेल्या आत्महत्यांनी परिसर हादरला आहे.
नवी मुंबई - कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाल्याने रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोपर खैरणे सेक्टर 2 येथे हि घटना घडली आहे. दरम्यान एकाच दिवशी त्याच परिसरात दोन आत्महत्या घडल्या आहेत.
शिवकुमार वसंतलाल गुप्ता (31) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे. ते सहपरिवार सेक्टर 2 येथे रहायला होता. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास लावून राहत्या घरात आत्महत्या केली. त्याने कर्जावर रिक्षा घेतली होती. परंतु लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यापासून त्याची रिक्षा धंदा नसल्याने उभीच होती. यामुळे रिक्षा घेण्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायची याची त्याला चिंता लागली होती. याच तणावात त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकाच दिवशी याच परिसरात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. तर दोन दिवस अगोदरच एका इंजिनिअर तरुणाने देखील आत्महत्या केलेली. त्यामुळे सलग दोन दिवस परिसरात घडू लागलेल्या आत्महत्यांनी परिसर हादरला आहे.
आणखी बातम्या वाचा...
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस