मिस्ड कॉलमुळे मैत्री झाली, जगण्या-मरण्याची शपथ घेतली; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 02:59 PM2022-04-20T14:59:36+5:302022-04-20T15:06:30+5:30

Crime News : एका तरुणीने आपल्या प्रियकरावर फसवणूक केल्याचा आरोप करत चौकात एकच गोंधळ घातला.

deception found in love drama of girl at crossroads accused lover of leaving her after physical abuse | मिस्ड कॉलमुळे मैत्री झाली, जगण्या-मरण्याची शपथ घेतली; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

मिस्ड कॉलमुळे मैत्री झाली, जगण्या-मरण्याची शपथ घेतली; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहारच्या कटिहार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकरावर फसवणूक केल्याचा आरोप करत चौकात एकच गोंधळ घातला. तर तरुणाने या तरुणीचे आरोप फेटाळून लावले आहे. मिस्ड कॉलमुळे या दोघांची ओळख झाली होती. पुढे त्यांनी एकत्र जगण्या मरण्याची शपथ घेतली होती. पण असं काही झालं की आता तरुणीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दशरथ असं या प्रियकराचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यात आधी मिस कॉलमुळे मैत्री झाली होती. 

हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र 2 वर्षातच वाद सुरू झाले. तरुणीला दशरथसोबत लग्न करायचं होतं. पण यासाठी तो तयार नव्हता. जेव्हा तिने प्रियकरावर दबाव टाकला तर त्याने तिला त्याचा भाऊ पोलिसात असल्याचे सांगितले. तसेच त्याचे कोणी काहीच करू शकत नाही, असे सांगितले. ती पोलिसांत देखील गेली होती. मात्र, तिला कोणतीच मदत मिळाली नाही. 

तरुणीने तिच्या प्रियकराच्या घराजवळच्या चौकात ठिय्या मांडत गोंधळ केला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रियकरासोबत संपर्क झाला नाही. तरुणीने त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, दशरथच्या भावाने तरुणीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच याप्रकरणी ते पोलिसांत तक्रार देणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अजून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही असं म्हटलं आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: deception found in love drama of girl at crossroads accused lover of leaving her after physical abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.