फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात
By मुरलीधर भवार | Published: June 7, 2024 05:58 PM2024-06-07T17:58:00+5:302024-06-07T17:58:37+5:30
पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले
मुरलीधर भवार, कल्याण: शिंदे सेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांना फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा दीपक कदम याला कोळसेवाडी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले. त्याने फेसबूक अकाऊंटवरून गायकवाड यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. कदम हा गायकवाड यांना आेळखत नाही. यापूर्वी ता्े त्यांना कधी भेटलेला नाही. फेसबूकवर तो का’मन फ्रेंड होता. तो यापूर्वी काही काळ दिव्यात राहण्यास होता. त्याची पहिली पत्नी मयत झाल्यावर त्याने दुसरे लग्न केले. त्याची दुसरी पत्नीही त्याला २०१३ मध्ये सोडून गेली.
त्याचा एक भाऊ अपंग आहे. एक भाऊ अंबरनाथला तर दुसरा विठ्ठलवाडी येथे राहतो. त्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे ऐकले होते. त्या आधारे त्यांनी दारुच्या नशेत आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या. मी तुला आठ गोळ्या घालीन अशी धमकी फेसबूकवरुन दिली. त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने दारुच्या नशेत त्यांनी हे काम केले. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी महेश गायकवाड यांच्या तक्रारीच्या आधारे अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयात अटक करता येत नाही. त्यामुळे दीपकला चाैकशीकरीता ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करुन त्याला समज देत पोलिसांनी सोडून दिले आहे.