भयंकर! तालिबानी पद्धतीने युवकाची हत्या; मृतदेह पाहून सगळेच हादरले, पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 01:31 PM2022-09-28T13:31:58+5:302022-09-28T13:32:56+5:30

शेजारील गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील मुलीसोबत दीपकचे प्रेमसंबंध होते. मुलीचे वडील हेयर ड्रेसर होते.

Deepak Tyagi Murder in Meerut, Everyone was shocked to see the dead body | भयंकर! तालिबानी पद्धतीने युवकाची हत्या; मृतदेह पाहून सगळेच हादरले, पोलिसही हैराण

भयंकर! तालिबानी पद्धतीने युवकाची हत्या; मृतदेह पाहून सगळेच हादरले, पोलिसही हैराण

googlenewsNext

मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं दीपक त्यागी नावाच्या युवकाचा तालिबानी पद्धतीने खून करण्यात आला आहे. शिर नसलेला मृतदेह पाहून पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा आला. दीपकच्या आरोपींपूर्वी मृतदेहाचं शिर शोधणं पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये दीपकच्या हत्येमागं प्रेम प्रकरण अथवा एखाद्याशी शत्रूत्व असण्याचा पोलिसांना संशय आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी एका युवतीसह काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली परंतु काहीही पुरावा हाती लागला नाही. मुख्य रस्त्यापासून ऊसाच्या शेतापर्यंत रक्ताचे डाग पाहून ही घटना ही गंभीर आहे याचा प्रत्यय येतो. फॉरेन्सिक टीमच्या अंदाजानुसार, शिरच्छेद केल्यानंतर आरोपींनी मृतदेह २० मीटरपर्यंत त्याला फरफटत नेला असावा. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. शिर नसलेल्या मृतदेहाचं अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. या घटनेने गावकरी स्तब्ध झाले आहेत. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

गावकऱ्यांनी सांगितले की, दीपकची निर्दयी हत्या करत आरोपींनी त्याचे शिर कापून घेऊन गेले. सध्या त्याचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे. दीपकच्या हत्येमुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे यासाठी पोलिसांनी कुटुंबाला विनंती केली. परंतु आरोपींना जोवर पकडलं जात नाही. दीपकचे शिर मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका कुटुंबाने घेतली आहे. 

दीपकचे युवतीसोबत प्रेमसंबंध
एसपी देहात केशव कुमार यांच्यानुसार, शेजारील गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील मुलीसोबत दीपकचे प्रेमसंबंध होते. मुलीचे वडील हेयर ड्रेसर होते. दीपकच्या नातेवाईकांना ही बाब कळताच ते नाराज झाले. मुलाचा मोबाईलही त्याच्याकडून काढून घेण्यात आला. पोलीस दोघांच्या मोबाईलचा सीडीआर तपासत आहेत. युवती आणि तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. पीडित कुटुंबानेही युवतीच्या अँगलने पोलीस तपास करण्याची मागणी केली आहे. दीपकविरोधात पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल होते. दीपक दबंग होता आणि दारू पिऊन मारामारी करायचा. आईवडिलांनी अनेकदा रागाने दीपकला ओरडले आहेत. दबंग असल्याने अनेकांशी त्याचे शत्रूत्व होते. त्यामुळे पूर्व वैमनस्यातून ही हत्या झालीय का या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत. 

मध्यरात्रीपर्यंत राज्यमंत्र्यांचा ठिय्या
मंत्री दिनेश खटीक आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत गावात ठिय्या मांडला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी त्यांनी केली. दीपकचे वडील धीरेंद्र त्यागी शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. दीपक हा लहान मुलगा होता. २ मुलींचे लग्न झाले. शेतात दीपकचा शिर नसलेला मृतदेह पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ज्याने दीपकचा मृतदेह पाहिला तो थरथर कापला. 

Web Title: Deepak Tyagi Murder in Meerut, Everyone was shocked to see the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस