Deepali Chavan Suicide : आरोपी विनोद शिवकुमार बाला यांच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:27 PM2021-03-29T19:27:53+5:302021-03-29T19:28:51+5:30

Deepali Chavan Suicide Case :तेथे त्याला प्रथम न्यायाधीशानी 30 मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.

Deepali Chavan Suicide: Accused Vinod Shivkumar Bala's police custody extended | Deepali Chavan Suicide : आरोपी विनोद शिवकुमार बाला यांच्या पोलीस कोठडीत वाढ

Deepali Chavan Suicide : आरोपी विनोद शिवकुमार बाला यांच्या पोलीस कोठडीत वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी विनोद शिवकुमार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हया कर्तव्यावर असताना त्यांना मध्यरात्री जंगलात बोलावत होता, तर कित्येक वेळा त्यांना त्याने जंगलातून फोटो सेल्फी काढून पाठवायला सांगितले होते.

पंकज लायदे

धारणी (अमरावती) : हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार बाला याला अटक केल्यानंतर तीन दिवसांचा पीसीआर मिळाला होता. पीसीआर संपल्यानतर सोमवारी त्याला पुन्हा कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला प्रथम न्यायाधीशानी 30 मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.


प्राप्तमाहितीनुसार, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वरिष्ठांकडून विशेष महिला पोलीस अधिकारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे रविवारी तपास सोपविल्यानंतर आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय वर्षा खरसान, पीएस आय सुयोग महापुरे, पोलीस कर्मचारी अनिल झारेकर, अरविंद सरोदे यांनी कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा  सोमवारी  दुपारी दीड वाजता न्यायालय धारणी येथे हजर केले असता, प्रथम न्यायाधीश एम.एस. गाडे यांनी त्याला एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावल्याने आरोपी विनोद शिवकुमार बाला हा 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

 

चिखलदरा निवस्थानाहून दस्तऐवज केले जप्त; कार्यालयीन कमरचाऱ्यांचे बयान नोंदविले

गुगामाल वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार बाला याला रविवारी दुपारी 2 वाजता दरम्यान चिखलदऱ्यातील त्याच्या कार्यालयात व शासकीय निवासस्थानी नेण्यात आले होते. तेथे त्याच्याकडून लॅपटॉप, पेन ड्रॉइव्ह आणि शासकीय दस्तऐवज जप्त केले. तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांचे बयाण पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे. 


मध्यरात्री बोलावण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी 

आरोपी विनोद शिवकुमार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हया कर्तव्यावर असताना त्यांना मध्यरात्री जंगलात बोलावत होता, तर कित्येक वेळा त्यांना त्याने जंगलातून फोटो सेल्फी काढून पाठवायला सांगितले होते. ते त्यांनी सुसाईड मध्ये नमूद केले. त्या कारणाने त्याला पोलीसानी जंगलातील त्या घटनास्थवर नेले होते.


अमरावतीहून अतिरिक्त पोलीस बल धारणीत

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अटक आरोपी विनोद शिवकुमार बाला यांची 29 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने त्यांच्याप्रति प्रत्येकाच्या मनात रोष निर्माण असल्याने काही अनुचित घटना घडून नये त्याकरिता ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी रात्रीच अमरावती ग्रामीण दंगा नियंत्रण पथक बोलावून घेतले आहे.

प्रथम युक्तिवाद करणारे अधिकारी वकील बदलले

आरोपी विनोद शिवकुमार बाला यांच्या संदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणात प्रथम एसडीपीओ संजय काळे यांनी बाजू मांडली होती. त्यांच्या ठिकाणी सोमवारी एसडीपीओ पूनम पाटील यांनी दीपाली चव्हाण यांची बाजू मांडली तर आरोपी शिवकुमार यांच्याकडून ही प्रथम वकील सुशील मिश्रा यांनी बाजू मांडली होती. सोमवारी परतवाडा येथील वकील एस. एस. प्रजापती यांनी बाजू मांडली. दोघाकडून प्रथम युक्तिवाद करणारे अधिकारी वकील बदलले आहे.

युक्तिवाद 

मृतक दीपाली चव्हाण यांच्या मोबाईलमध्ये मृत व आरोपीच्या संभाषणाची आँडिओ क्लिप सापडली आहे. त्यात झालेले संभाषण आरोपीचेच काय, हे तपासण्याकरिता अमरावती येथून पोलीस पथक बोलाविले आहे. जप्त मोबाईलमधील डीसीआर मागविला आहे. त्याची तपासणी करून आणखी काही पुरावे मिळणार आहे.  सुसाईड नोटमध्ये घटनेचा कालावधी हा एक वर्षापासून आरोपी तिला मानसिक त्रास, अपमानित करत असल्याचे नमूद आहे. त्या वेगवेगळ्या घटना स्थळावर जाऊन तेथील उपस्थितांचे बयान घेणे सुरू आहे. त्यासह त्या 1 वर्षात काय घडलं याचा सविस्तर तपास करणे गरजेचे आहे.  सुसाईड नोटमध्ये इतरही काही वयक्तींची नावे, आहे त्यांची चौकशी करणे असल्याणारे आणखी सात दिवसाचा वाढीव पीसीआर देण्यात यावा अशी मागणी केली होती. - पूनम पाटील; उपविभागीय पोलीस अधिकारी 

 

मृताचा मोबाईल यांच्याकडे घटनेपासून जप्त आहे. त्यानंतर ती आयडिओ क्लिप सोशल मीडिया वर पण व्हायरल झाली आहे त्याच वेळी यांनी ती तपासणी करायला पाहिजे होती वेळ देने गरजेचे नाही. त्यासाठी अमरावती वरून पथक बोलविण्याची गरज नाही हे स्वतापन फॉरेन्सिक लॅब ला पाठवू शकले असते. आयडिओ  क्लिप ज्या मोबाईल मधून मिळविली आहे तेच मोबाईल न्यायालयासमोर करण्यात यावे. जप्त मोबाईल मधील सिडीआरमध्ये फक्त कोणाशी बोलणे झाले यांचे मो न व वेळ लिहून येते.  त्यामुळे आरोपीची तापास कामी याना गरज नाही त्यामुळे आरोपीला पीसीआर देऊ नये. यावर युक्तिवादानंतर फक्त एक दिवसाचा 30 मार्चपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे. - एस. एम. प्रजापती, आरोपी वकील 

Web Title: Deepali Chavan Suicide: Accused Vinod Shivkumar Bala's police custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.