दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
By पूनम अपराज | Published: September 26, 2020 04:12 PM2020-09-26T16:12:28+5:302020-09-26T16:18:35+5:30
Sushant Singh Rajput Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन - चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला.
मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलने सुरु असलेल्या तपासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणला शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबी कार्यालयात पोचली आहे आणि तिची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान एनसीबीने दीपिकाचा फोन जप्त केल्याची माहिती आज तकने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन - चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. रिपोर्ट्सनुसार, प्रश्न विचारणाऱ्या टीमला केपीएस मल्होत्रा लीड करत आहेत.एनसीबी दीपिका पादुकोणची तीन ते चार राउंडमध्ये चौकशी करू शकते असेही सांगितले जात आहे. पहिल्या फेरीत जया साहा आणि करिश्मा प्रकाश यांच्या स्टेटमेंटसंदर्भात प्रश्न असू शकतात, तर दुसर्या राउंडमध्ये व्हॉट्स अॅप ग्रुपचे स्क्रीनशॉट, चॅट आणि त्यांचे फोन याबद्दल प्रश्न उद्भवू शकतात. तिसऱ्या राउंडमध्ये दीपिकाची चौकशी केली जाऊ शकते आणि चौथ्या फेरीत दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोर बसवून चौकशी होऊ शकतो, अशी माहिती आज तकने दिली आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी केली जात आहे. आज सकाळी दीपिकाला एनसीबी कार्यालयात बोलविण्यात आले. तिचे ड्रग्स चॅट तिच्या मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबत सापडले, त्यानंतर तिला समन्स बजाविण्यात आले. दीपिकाच्या चौकशी कक्षात केपीएस महलोत्रा आणि त्यांच्या टीमच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त एनसीबीची एक महिला अधिकारीही उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपिका पादुकोण यांचा मोबाईल फोन एनसीबीने वेगळा ठेवला आहे. करिश्मा, जया आणि दीपिकाच्या ड्रग्स चॅटबद्दल थेट प्रश्न उपस्थित होत आहेत.
दीपिका पादुकोण आल्यानंतर तात्काळ तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश देखील एनसीबी कार्यालयात पोहोचली. शुक्रवारी करिश्माची एनसीबीने चौकशी केली. आता पुन्हा दीपिकासमोर बसून प्रश्न विचारले जात आहेत. या चौकशीत अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खानलाही हजर राहावे लागले. असे सांगितले जात आहे की सारा अली खान आणि श्रद्धा कपूर दोघीही एएनसीबी चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी त्यांच्या कायदेशीर टीमचा सल्ला घेत होत्या, त्यासाठी दोघांनी एनसीबीकडे वेळ मागितला होता. एनसीबीने दोघांना परवानगी दिली. सारासह तिची आई अमृता सिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कायदेशीर पथकाचा सल्ला घेत आहेत. आता या दोघी एनसीबीसमोर काय खुलासा करतात ते पहावे लागेल.
दीपिका Whats App ग्रुपची अॅडमिन होती?
एनसीबी आज दीपिका पादुकोणची चौकशी करेल. दीपिकाची मॅनेजर करिश्मासोबतचे तिचे काही ड्रग्ज चॅट उघडकीस आले होते. या Whats App चॅटमध्ये दीपिका करिश्माकडे माल मागत होती. याबाबत दीपिकाने कबुली देखील दिली आहे. यासोबतच करिश्मा आणि दीपिका ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बोलत होत्या त्या ग्रुपची अॅडमिन दीपिका होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या