बॉलिवूडमध्ये खळबळ! दीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 08:11 PM2020-09-23T20:11:45+5:302020-09-23T20:20:59+5:30
Sushant Singh Rajput Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे. तर गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील ‘ड्रग्ज’ कनेक्शनप्रकरणी आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रुकुल प्रितीसिंग यांना चौकशीला पाचारण करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे. तर गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे.
टॅलेंट मॅनेजर जया साहा हिच्याशी केलेल्या whats app चॅट समोर आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे एनसीबीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडमधील ड्रग रॅकेट उघडकीस आले. त्याच्या तपशिलातून या 'अप्सरां'चा त्यातील सहभाग उघड झाला असून त्याच्याकडील चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये जया सहा व ड्रग तस्कर अनुजकडील चौकशीतून प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनचे नाव पुढे आले. त्याचबरोबर तिच्याकडे मॅनेजर म्हणून काम केलेल्या करिश्मा प्रकाश हिच्याशी तिचा ड्रग चॅट एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे. 28 ऑक्टोबर 2017 मध्ये एका पार्टीमध्ये तिने 'माल'ची विचारणा केली आणि तिला गांजाची पूर्तता केली जाईल, सांगण्यात आले आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून विचारणा केली जाणार आहे.
सुशांतसिह याच्या समवेत केदारनाथ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खान ही शुटिंग दरम्यान गांजा घेत होती, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने दिला आहे. जया साहाने त्याबद्दल माहिती दिली आहे तर श्रद्धा कपूर सीबीडी ऑईल घेत असल्याचा जबाब दिला आहे. त्यांच्याप्रमाणेच अभिनेत्री रुकुलप्रीत सिह, सिमोन खंबाटा यांच्या सहभागाबाबत पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे या सर्वांकडे सविस्तर चौकशी केली जाणार आहे. त्यांना समन्स बजाविण्यात आले असून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे एनसीबीचे उप संचालक केपीएस मल्होत्रा यांनी बुधवारी स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल
अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध
धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून