‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अॅडमिन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:42 AM2020-09-26T06:42:45+5:302020-09-26T06:43:06+5:30
एनसीबीकडून आज चौकशी; करिश्माने ड्रग्ज संवादाबाबत दिली कबुली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर, क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश यांच्या व्हायरल झालेल्या २०१७च्या ड्रग्ज चॅट ग्रुपची दीपिका अॅडमिन असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, शनिवारी अमली पदार्थ नियंत्रक विभाग (एनसीबी) दीपिकाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये याच ग्रुपमधून ड्रग्जची मागणी केली होती. बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी करिश्माकडे याबाबत एनसीबीने चौकशी केली. तिने या ड्रग्ज संवादाबाबत कबुली दिल्याचेही समजते.
‘माल है क्या?’, असा सवाल दीपिकाने केला होता. यात माल म्हणजे नेमके काय? अशाच अनेक प्रश्नांबाबत करिश्माकडे चौकशी करण्यात आली. शनिवारी या ग्रुपसह या संवादातील ड्रग्जबाबत दीपिकाकडे चौकशी करण्यात येईल.
वकिलाचे आरोप ‘एम्स’च्या डॉक्टरांनी फेटाळले
च्सुशांतसिंह राजपूतची गळा दाबून हत्या केल्याची माहिती एम्सच्या डॉक्टरांकड़ून मिळाल्याची माहिती सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्युनंतर बहीण मीतूने काढलेले फोटो एम्सच्या एका डॉक्टरांना शेअर केले होते. त्यावरून सुशांतची २०० टक्के गळा दाबून हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. ते सध्या सीबीआयकडून तपास सुरू असलेल्या एम्सच्या पाच डॉक्टरांपैकी एक आहेत. सीबीआयचे पथक या डॉक्टरांची भेट घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी अॅड.विकास सिंह यांचे आरोप फेटाळून लावले.
च्सीबीआयने आतापर्यंत काय तपास केला, हे कळायला मार्गच नाही. तपास संथ गतीने सुरू आहे किंवा पुढे सरकत नाही, ड्रग्ज प्रकरणामुळे मृत्यूचा तपास भरकटल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाच्या वतीने वकील सिंह यांनी केला.